शिक्षकांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:33 PM2018-02-17T23:33:41+5:302018-02-17T23:34:01+5:30
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमोर व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमोर व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. दोन्ही संघटनांच्या शिक्षकांनी निवेदन सादर केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सेवानिवृत्तीच्या दिवशी सेवानिवृत्तधारकाला सर्व लाभ देऊन आनंदी सेवा निवृत्ती दिन साजरा करावा, वरिष्ठ वेतन श्रेणी व प्रलंबित निवड श्रेणीचे प्रकरणे मंजूर करावी, स्वच्छतागृहांचा रखडलेला अंतिम हप्ता देण्यात यावा, अंशदायी पेन्शन योजनेच्या जमा रकमेचा ताळमेळ जोडविण्यात यावा, शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुखांची पदे प्राथमिक शिक्षक संवर्गातून पदोन्नती भरावी, एकस्तर पदोन्नतीची वेतनश्रेणी विकल्पानुसार सुरू ठेवावी, शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेला करावे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलनस्थळाला जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार, जि.प. सदस्य अॅड. राम मेश्राम, मनिषा दोनाडकर यांनी भेट दिली. आंदोलनात जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार, रमेश रामटेके, नरेंद्र कोत्तावार, जीवन शिवणकर, योगेश ढोरे, अमरसिंह गेडाम, माया दिवटे, अशोक दहागावकर, गुलाब मने, डंबाजी पेंदाम, रवींद्र मुलकलवार, मनोज रोकडे, शिवाजी जाधव, नरेश चौधरी, शेषराव संगीडवार, संजय लोणारे, ओमप्रकाश गर्गम, गडपायले, सुनील चरडुके यांच्यासह शेकडो शिक्षक आंदोलनस्थळी हजर होते.
शिक्षक परिषदेचा जिल्हा कचेरीसमोर ठिय्या
यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी, १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करावा या मुख्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्टÑ राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांच्या मार्फत मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना पाठविण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय साळवे, संतोष सुरावार, कार्यवाह प्रमोद भांडेकर, गोपाल मुनघाटे, अविनाश तालापल्लीवार, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत शेंडे, सत्यवान मेश्राम, नत्थूजी पाटील, निलेश खोब्रागडे, देविदास गणवीर, सुरेंद्र धकाते, मोहन देवकते, दिगांबर देवकते, प्रशांत थोटावार, शिवदास वाढणकर, पुरूषोत्तम बोरीकर, जी. पी. उंदीरवाडे, निलेश विश्रोजवार, आर. आर. बनपूरकर, वेलादी, किरण तोटावार, डी. वाय. खेवले, रेमाजी चुधरी, जे.पी. उंदीरवाडे, आर. टी. वेलादी, आर. आर. बनपूरकर, टी. एस. बोरीकर, व्ही. एल. बुरमवार, एम. एन. विश्रोजवार, डी. के. वेलादी, आर. एस. झोडे, ईश्वरदास राऊत आदी उपस्थित होते.