शिक्षकांअभावी बंद पडला ५ वा वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 10:51 PM2018-07-30T22:51:12+5:302018-07-30T22:52:01+5:30

गडचिरोली शहरात चामोर्शी मार्गावर जिल्हा परिषदेची सर्वात जुनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहे. मात्र या शाळेत शिक्षकांची चार पदे रिक्त आहेत. शिकविण्यासाठी शिक्षक नाही. शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. या कारणाने सदर जि.प. माध्यमिक शाळेतील पाचवा वर्ग यावर्षीच्या सत्रापासून बंद पडला आहे.

The teachers were stopped due to lack of 5th class | शिक्षकांअभावी बंद पडला ५ वा वर्ग

शिक्षकांअभावी बंद पडला ५ वा वर्ग

Next
ठळक मुद्देचार पदे रिक्त : जि.प.च्या हायस्कूलकडे दुर्लक्ष
<p>लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहरात चामोर्शी मार्गावर जिल्हा परिषदेची सर्वात जुनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहे. मात्र या शाळेत शिक्षकांची चार पदे रिक्त आहेत. शिकविण्यासाठी शिक्षक नाही. शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. या कारणाने सदर जि.प. माध्यमिक शाळेतील पाचवा वर्ग यावर्षीच्या सत्रापासून बंद पडला आहे. सदर शाळेतील इयत्ता पाचव्या वर्गात सुरूवातीला पाच ते सहा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. मात्र शिक्षक नसल्याचे कळताच पालकांनी टीसी काढून नेल्या.
या जि.प. माध्यमिक शाळेत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा आहे. नामांकिेत शाळा म्हणून एकेकाळी या शाळेची ओळख संपूर्ण जिल्ह्यात होती. मात्र जि.प. प्रशासन व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे या शाळेला उतरती कळा लागली आहे. इयत्ता पाच ते सात या तीन वर्गांसाठी चार शिक्षकांची गरज आहे. किमान तीन शिक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक होते. मात्र येथे सध्या एकच शिक्षक कार्यरत आहे. या शिक्षकावर सहा व सातवी या दोन वर्गाचा भार आहे. इयत्ता आठ ते दहा वर्ग असलेल्या माध्यमिक विभागाकरिता विज्ञान विषयाचे शिक्षक नाही. हे पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे. सदर शाळेत इयत्ता अकरावीसाठी विज्ञान शाखा आहे. मात्र गेल्या तीन वर्षांपासून येथे भौतिकशास्त्र विषयाचे उच्च माध्यमिक शिक्षकांचे पद रिक्त आहे. गेल्या काही वर्षांपासून या शाळेला नियमित प्राचार्य नाही. डिआयइसीपीडीचे प्राचार्य पाटील यांच्याकडे प्राचार्य पदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडे भरपूर कामे राहत असल्याने शाळेसाठी ते सुध्दा पुरेसा वेळ देऊ शकत नाही.
हाकेच्या अंतरावरील शाळेबाबत उदासीनता
जि.प.च्या बऱ्याच शाळा सुस्थितीत आहेत. पालिकेची ही एक शाळा आयएसओ नामांकित आहे. मात्र जिल्हा परिषद कार्यालयापासून चार किमी अंतरावर असलेल्या जि.प. माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शाळेच्या समस्यांकडे जि.प.चे पदाधिकारी, अधिकारी व शिक्षण विभागाचे दुर्लक्ष आहे.

इयत्ता पाचवीसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश न झाल्याने हा वर्ग सध्या बंद पडला आहे. उच्च प्राथमिक विभागाला एकच शिक्षक असून भौतिकशास्त्र विषयाच्या उच्च माध्यमिक शिक्षकाचे पद रिक्त आहे. रिक्त पदे भरण्यासंदर्भात आपण शिक्षणाधिकाºयांना भेटून प्रत्यक्ष चर्चा केली. पुढील वर्षात या शाळेची परिस्थिती नक्कीच बदलेल.
- डॉ. शरदचंद्र पाटील,
प्रभारी प्राचार्य, जि.प. हायस्कूल तथा विज्ञान क. महाविद्यालय गडचिरोली

Web Title: The teachers were stopped due to lack of 5th class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.