शिक्षक समिती हक्कांसाठी लढा देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:50 AM2018-03-31T00:50:28+5:302018-03-31T00:50:28+5:30
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा लढा नेहमीच शिक्षकांच्या अस्मितेचा लढा राहिला आहे. शिक्षकांवरील शासनाच्या अन्यायाविरोधात शिक्षक समितीने नेहमीच वाचा फोडली आहे.
ऑनलाईन लोकमत
कुरखेडा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा लढा नेहमीच शिक्षकांच्या अस्मितेचा लढा राहिला आहे. शिक्षकांवरील शासनाच्या अन्यायाविरोधात शिक्षक समितीने नेहमीच वाचा फोडली आहे. प्रत्येक वेळी समिती शिक्षकांच्या पाठिशी उभी राहिली असून शिक्षक समितीचा लढा शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी केले.
कुरखेडा येथे शिक्षक समितीच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार होते. याप्रसंगी राज्य महिला प्रतिनिधी माया दिवटे, रमेश रामटेके, नरेंद्र कोत्तावार, गणेश काटेंगे, शालिक मेश्राम, मेघराज बुरडे, ब्रम्हानंद उईके, प्रेम मेश्राम, बंडू सिडाम, राजेश बाळराजे, जयंत राऊत, डंबाजी पेंदाम, साईनाथ अलोणे, मनोज रोकडे उपस्थित होते. याप्रसंगी दिनू वगारे यांनी अनेक शिक्षकांसमवेत शिक्षक समितीत प्रवेश केला. याप्रसंगी तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली. अध्यक्षपदी खिरेंद्र बांबोळे, सरचिटणीस केशवराव पर्वते, कार्याध्यक्ष अंकरशाह मडावी, प्यारेलाल दाऊदसरिया, कोषाध्यक्ष अनिल उईके, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बांडे, भगवान मडावी, राजकुमार नागपूरकर, सहसचिव गुलाब सोनकुकरा, तुकाराम मुंडे, कार्यालयीन सरचिटणीस दीपक ढबाले, प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर निकोडे, दीपक घोडमारे, विभाग प्रमुख मुरलीधर पुस्तोडे, रवी नगरकर, अब्दुल कुरेशी, धनराज दुधकुंवर, संजय कोडवते, रेखचंद बन्सोड, केंद्राध्यक्ष दीपक पिलेवान, सोनुराम कपुरडेरिया, रोहिदास मोहुर्ले, सुरेश वझे, मधुकर मिसार, नंदकिशोर धोटे, हेमराज सुकारे, जांबुवंत भरणे, महिला आघाडी प्रमुख वैैशाली कोसे, सल्लागार मेघराज बुरडे, शालिक मेश्राम, दीनेश वघारे, सुभाष गणोरकर, भीमराज पात्रीकर, हेमंत पिलेवान, सुरेश सहारे यांची निवड करण्यात आली. संचालन नरेश चौधरी तर आभार केशव पर्वते यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिक्षकांनी सहकार्य केले.