शिक्षकांना मिळणार तंत्रज्ञानाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:56 PM2019-01-29T23:56:37+5:302019-01-29T23:57:52+5:30

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी, विद्यार्थी, शिक्षक व पालकांना शैक्षणिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

TEACHNIQUE TEXT | शिक्षकांना मिळणार तंत्रज्ञानाचे धडे

शिक्षकांना मिळणार तंत्रज्ञानाचे धडे

Next
ठळक मुद्देडीआयईसीपीडीचा उपक्रम : विद्यार्थी, पालक, केंद्रप्रमुखांनाही होणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी, विद्यार्थी, शिक्षक व पालकांना शैक्षणिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन केल्यास विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाविषयीची रूची वाढून त्यांचे लक्ष केंद्रीत राहण्यास मदत होते. त्यामुळे मागील काही वर्षांपासून शिक्षकांनी जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर अध्यापन करताना करावा, असे निर्देश शिक्षण विभागाकडून दिले जात आहेत. विविध प्रकारचे अ‍ॅप तयार करण्यात आले आहेत. मात्र काही शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकाºयांना या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, हे समजत नाही. त्यामुळे साहित्य असूनही त्यांचा वापर होत नाही. यावर उपाय म्हणून जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था गडचिरोलीचे प्राचार्य डॉ.शरदचंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून मागणी करेल, त्या शिक्षक व अधिकाºयांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पर्यवेक्षीय यंत्रणेतील केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विषय साधनव्यक्ती, विशेष तज्ज्ञ, फिरते शिक्षक, पालक, विद्यार्थी, प्राथमिक शिक्षक, विषय शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक यांना प्रशिक्षण मिळणार आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसºया शनिवारी माहिती तंत्रज्ञान विषयावर मार्गदर्शन केले जाईल. यासाठी डायटने स्वतंत्र लिंक तयार केली आहे. प्रशिक्षण घेऊ इच्छीणाºयाने या लिंकवर माहिती भरणे आवश्यक आहे. माहिती भरताना प्रशिक्षणार्थ्याचे नाव, पद, शाळेचे नाव, तालुका, मोबाईल क्रमांक, ई-मेल, कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण घ्यायचे आहे, याबाबत माहिती भरावयाची आहे. या नावीण्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.शरदचंद्र पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.विनीत मत्ते, संभाजी भोजने, डॉ.नरेश वैद्य, मिलींद अघोर, पुनित मातकर, वैशाली येगलोपवार, विषय सहायक कुणाल कोवे, डॉ.विजय रामटेके, विठ्ठल होंडे, नीलकंठ शेंडे, सुचरिता काळे, अश्फिया सिद्धीकी हजर होते.
या बाबींचे दिले जाणार प्रशिक्षण
शैक्षणिक अ‍ॅप डाऊनलोड करणे, त्यांचा वापर करणे, ई-मेलविषयीची माहिती, शैक्षणिक व्हिडीओ डाऊनलोड करणे, इंटरनेटवरून आवश्यक ती माहिती काढणे याचबरोबर शैक्षणिक तंत्रज्ञानाविषयीची जी माहिती प्रशिक्षणकर्ता विचारेल, त्याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रशिक्षणाला येताना प्रशिक्षणार्थ्याने लॅपटॉप, अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल, चार्जर, डेटा इंटरनेट पॅक, एक्स्टेक्शन बॉक्स आदींपैकी प्रशिक्षणासाठी गरजेचे साहित्य सोबत आणणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाला येणाºयांना डायटकडून प्रवास व दैनिक भत्ता दिला जाणार नाही. प्रशिक्षण मात्र नि:शुल्क राहील.

Web Title: TEACHNIQUE TEXT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक