उमेदच्या कृषी सखींना तंत्र शेतीचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:45 AM2021-07-07T04:45:18+5:302021-07-07T04:45:18+5:30

शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीबरोबरच उत्पन्न वाढीतून आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी विविध स्तरांतून उपक्रम राबविले जातात. त्यात कृषी विभाग,आत्मा व अन्य ...

Technical farming training for Umed's agricultural friends | उमेदच्या कृषी सखींना तंत्र शेतीचे प्रशिक्षण

उमेदच्या कृषी सखींना तंत्र शेतीचे प्रशिक्षण

Next

शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीबरोबरच उत्पन्न वाढीतून आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी विविध स्तरांतून उपक्रम राबविले जातात. त्यात कृषी विभाग,आत्मा व अन्य यंत्रणा काम करत आहेत. त्यात उमेद हे सुद्धा शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करत आहे. उमेदच्या कृषी सखींना तंत्रशुद्ध ज्ञान असणे आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहाेचणे आवश्यक असल्याने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)अंतर्गत कृषी सखींना प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये धान लागवडीची पेरभात, पट्टा पद्धत, श्री पद्धत, एसआरटी पद्धत आदींबाबत तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. भातपिकांमध्ये पाणी, खत व्यवस्थापन, कीड व रोगांचे नियंत्रण, कापणी, प्रक्रिया उद्योग याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी आनंद पाल, मंडळ कृषी अधिकारी एल. एस. पाठक, उमेदचे तालुका समन्वयक नारायण धुर्वे, सहायक वासुदेव तांदुलकर यांच्यासह कृषी सखी उपस्थित होते.

Web Title: Technical farming training for Umed's agricultural friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.