पर्यटन विकासाला तांत्रिक मंजुरीची आडकाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 01:11 AM2019-01-02T01:11:23+5:302019-01-02T01:12:12+5:30

जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर विविध सोईसुविधा निर्माण करण्यासोबतच तेथील सौंदर्यात भर घालणाऱ्या गोष्टी करण्यासाठी चालू आर्थिक वर्षाकरिता ५ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. परंतु अनेक ठिकाणच्या कामांचे प्रस्ताव तांत्रिक मंजुरीअभावी अडून पडले आहेत.

Technical sanction for tourism development | पर्यटन विकासाला तांत्रिक मंजुरीची आडकाठी

पर्यटन विकासाला तांत्रिक मंजुरीची आडकाठी

Next
ठळक मुद्दे५.२५ कोटींचा निधी पडून : सोईसुविधा देण्यासाठी प्रशासन तयार, वनविभागाकडून विलंब

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर विविध सोईसुविधा निर्माण करण्यासोबतच तेथील सौंदर्यात भर घालणाऱ्या गोष्टी करण्यासाठी चालू आर्थिक वर्षाकरिता ५ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. परंतु अनेक ठिकाणच्या कामांचे प्रस्ताव तांत्रिक मंजुरीअभावी अडून पडले आहेत. त्यामुळे या आर्थिक वर्षात हा निधी खर्च होणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
नक्षलग्रस्त म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक ठिकाणं आहेत. परंतू त्या ठिकाणी सोयीसुविधांचा अभाव असल्यामुळे लांबून आलेल्या पर्यटकांची अनेक वेळा फजिती होते. या ठिकाणांवर पिण्याच्या पाण्याच्या सोयीसोबत स्वच्छतागृह आणि इतर सोयी केल्यास पर्यटकांना मोठा दिलासा मिळू शकतो. यातीलकाही ठिकाणं वनविभागाहाच्या हद्दीत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणच्या कामांसाठी वनविभागाची तांत्रिक मंजुरी आवश्यक आहे.
जिल्ह्यात वनखात्याचे ५ विभाग असले तरी बांधकामाच्या मंजुरीसाठी एकही स्थापत्य अभियंता येथे नाही. त्यामुळे वनविभागाला आपले सर्व प्रस्ताव नागपूर येथील वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवावे लागतात. तेथून मंजुरी येण्यास अनेक महिन्यांचा कालावधी निघून जातो. यावर्षी तर तांत्रिक मंजुरीच्या प्रतीक्षेत आर्थिक वर्षही संपून जाणार की काय, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ७ कोटी १५ लाखांपेक्षा अधिक खर्चाच्या कामांवर चर्चा झाली आहे. परंतू बहुतांश कामांना अद्याप सुरूवातही झालेली नाही.

वनविभागाच्या मंजुरीनंतर होणारी कामे
कमलापूर येथील हत्ती कॅम्प मध्ये पर्यटकांसाठी विविध सोयी, सेमाना मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण, टिप्पागड येथील विकास कामे, झाडापापडा येथील विकास कामे, आलापल्ली वनविभागांतर्गत घोट येथे वीर बाबूराव शेडमाके सभागृहाचे काम, घोट येथील बगीचातील विकास कामे, चपराळा अभयारण्यातील विविध विकास कामे.

या कामांना देणार प्राधान्य
वनविभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर धानोरा तालुक्यातील टिप्पागड येथे सिमेंट रस्ता, रेलिंग, रपट्याचे काम केले जाणार आहे. वडसा तालुक्यातील आमगाव येथील राम मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल, टाकी, सोलर नळ, स्वच्छतागृह, पेविंग ब्लॉक, ओटे आदी कामे होणआर आहेत. याच पद्धतीने धानोरा तालुक्यातील झाडापापडा येथील शिवमंदिरातही विविध कामे केली जातील.

Web Title: Technical sanction for tourism development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन