तहसीलदारांनी १५ ट्रक पकडले
By admin | Published: September 29, 2016 01:34 AM2016-09-29T01:34:13+5:302016-09-29T01:34:13+5:30
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सिरोंचाचे तहसीलदार अशोक कुमरे यांनी येथील गोदावरी नदीच्या पुलालगत वन विभागाच्या नाक्याजवळ
गोदावरी नदीतून सुरू होती रेती तस्करी : जुन्या टीपीच्या भरवशावर वाहतूक
सिरोंचा : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सिरोंचाचे तहसीलदार अशोक कुमरे यांनी येथील गोदावरी नदीच्या पुलालगत वन विभागाच्या नाक्याजवळ बुधवारी धाड टाकून रेतीची अवैध वाहतूक करणारे १५ ट्रक पकडले. सदर ट्रकवरील चालक व मजूर टीपीच्या क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे २७ सप्टेंबर ही तारीख असलेल्या टीपीवर २८ सप्टेंबर रोजी बुधवारला सदर ट्रकमधून अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असल्याचे तहसीलदारांना आढळून आले. रात्री उशिरापर्यंत मोका पंचनामा व कारवाईची प्रक्रिया सुरू होती. यापूर्वीही जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: अनेक वाहने पकडले होते. गोदावरी नदीवर पूल तयार झाला व उद्घाटनापूर्वीच वाहतुकीसाठी सुरू झाल्याने सिरोंचातून तेलंगणा राज्यात मोठ्या प्रमाणावर रेती तस्करी वाढली आहे. (शहर प्रतिनिधी)