जिल्हा परिषदेत दहा समित्यांचे गठन
By admin | Published: April 13, 2017 02:30 AM2017-04-13T02:30:32+5:302017-04-13T02:30:32+5:30
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या दहा विषय समित्यांवर जिल्हा परिषद सदस्यांची निवड करण्यासाठी बुधवारी सभा घेण्यात आली.
काँग्रेसच्या गटातून गण्यारपवार स्थायी समितीवर : दोन समित्यांवर एक-एक सदस्यांचे पद रिक्त
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या दहा विषय समित्यांवर जिल्हा परिषद सदस्यांची निवड करण्यासाठी बुधवारी सभा घेण्यात आली. या सभेत अत्यंत महत्त्वाच्या स्थायी समितीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या गटाकडून अतुल गण्यारपवार यांची वर्णी लागली.
स्थायी समितीवर आठ सदस्य असून यामध्ये भाजपचे भाग्यवान वासुदेव टेकाम, रमाकांत नामदेव ठेंगरे, नामदेव विठोबा सोनटक्के यांची वर्णी लागली आहे. तर काँग्रेसकडून मनोहर तुळशिराम पोरेटी, अॅड. रामभाऊ पुंडलिक मेश्राम व अपक्ष अतुल गंगाधर गण्यारपवार यांची वर्णी लावण्यात आली. आविसंतर्फे अनीता दीपक आत्राम, राकाँतर्फे युद्धिष्टीर दुखीराम बिश्वास यांना स्थायी समितीवर स्थान देण्यात आले आहे. तर जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीवर सहा सदस्यांची वर्णी लावण्यात आली आहे. यामध्ये नीता साखरे, रंजीता कोडापे, सुनीता कुसनाके, रमेश बारसागडे, श्रीनिवास दुलमवार, कविता प्रमोद भगत यांना स्थान देण्यात आले आहे.
कृषी समितीवर १० सदस्य निवडण्यात आले असून यामध्ये वनीता उदाराम सहाकाटे, नामदेव विठोबा सोनटक्के, सुमित्रा परमेश्वर लोहंबरे, ऋषी बोंडय्या पोरतेट, मितलेश्वरी जयंत खोब्रागडे, सैनू मासू गोटा, कुरखेडाचे पं. स. सभापती गिरीधार गंगाराम तितराम यांची वर्णी लागली आहे. या समितीत एक पद रिक्त ठेवण्यात आले आहे.
समाजकल्याण समितीत ११ सदस्यांची वर्णी लावण्यात आली. यामध्ये प्रभाकर तुकाराम तुलावी, मनीषा बोड्डाजी गावडे, मितलेश्वरी जयंत खोब्रागडे, अजय दादाराव नैताम, सैनू मासू गोटा, सुमित्रा परमेश्वर लोहंबरे, पांडवला श्रीदेवी जयराम, पारधी रोशनी सुनील, आभारे विद्या हिंमतराव, सहाकाटे वनीता उदाराम, कुमरे गीता सुनील या जि. प. सदस्यांना स्थान देण्यात आले आहे.
शिक्षण व क्रीडा समितीत आठ सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये कल्पना प्रशांत आत्राम, गीता सुनील कुमरे, विद्या आभारे, सरिता तैनेनी, संपत यशवंत आळे, अनिल केरामी, मनोहर तुळशिराम पोरेटी, वैशाली किरण ताटपल्लीवार यांची वर्णी लावण्यात आली आहे. बांधकाम समितीवर आठ जि. प. सदस्यांची वर्णी लावण्यात आली आहे. यामध्ये लता पुंगाटे, वर्षा कौशिक, रमेश बारसागडे, पांडवला श्रीदेवी जयराम, सारिका आईलवार, रवींद्रनाथ निर्मल शहा, मनीषा मधुकर दोनाडकर, अॅड. लालसू सोमा नरोटी यांचा समावेश आहे.
वित्त समितीत भाग्यवान टेकाम, नाजुकराव पुराम, रंजीता कोडापे, संजय चरडुके, अजय नैताम, ज्ञानकुमारी टांगरू कौशी, सुखराम महागू मडावी यांची वर्णी लागली आहे. या समितीत एक पद रिक्त ठेवण्यात आले आहे.
आरोग्य समितीत संजय भाऊराव चरडुके, मनीषा बोड्डाजी गावडे, ऋषी पोरतेट, अनीता दीपक आत्राम, संपत यशवंत आळे, रूपाली संजय पंदीलवार, अजीज अहमदअली जीवानी, अॅड. रामभाऊ पुंडलिक मेश्राम यांना स्थान देण्यात आले आहे.
पशुसंवर्धन व दुग्ध शाळा समितीत चामोर्शी पंचायत समितीचे सभापती भांडेकर आनंद पत्रूजी, जि. प. सदस्य तैननी सरिता रमेश, शिल्पा धर्मा रॉय, नाजुकराव पुराम, प्रभाकर तुलावी, अजीज अहमदअली जीवानी, कोरचीच्या सभापती कचरीबाई प्रेमलाल काटेंगे, धानोराचे पं. स. सभापती अजमन मयाराम राऊत यांना स्थान देण्यात आले आहे.
महिला व बाल कल्याण समितीवर अहेरी पं. स. च्या सभापती सुरेखा दिवाकर आलाम, मुलचेरा पं. स. च्या सभापती सुवर्णा चंद्रशेखर येमुलवार, जि. प. सदस्य रोशनी पारधी, ज्ञानकुमारी कौशी, आरमोरी पं. स. सभापती बबीता जीवनदास उसेंडी, देसाईगंज पं. स. चे सभापती मोहन नामदेव गायकवाड, एटापल्ली पं. स. च्या सभापती बेबी मुंशी लेकामी यांची निवड झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
बोरकुटे, कराडे यांची वर्णी नाही
जिल्हा परिषदेतील ज्येष्ठ सदस्य जगन्नाथ बाजीराव बोरकुटे व कुरखेडा तालुक्यातून निवडून आलेले काँग्रेसचे सदस्य प्रल्हाद कराडे यांची एकाही विषय समितीवर वर्णी लागली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रल्हाद कराडे यांनी काँग्रेस पक्षाकडे जलव्यवस्थापन समितीवर सदस्यत्व मागितले होते. मात्र काँग्रेसकडून त्यांना आरोग्य व पशुसंवर्धन व दुग्ध शाळा या दोन समित्यांवर सदस्यत्व देण्याबाबत ठरले होते. तर जलव्यवस्थापन समितीवर पेंढरी-गट्टा मतदार संघातून निवडून आलेले श्रीनिवास सतय्या दुडमवार यांचे नाव काँग्रेसने निश्चित केले होते. कराडे शेवटपर्यंत या समितीसाठी आग्रही राहिले. मात्र सभापती पदाच्या निवडणुकीत कराडेंनी भाजपच्या नाकाडेंना मतदान केल्याने या बाबीवर दुडमवार यांनी आक्षेप नोंदविला. मी प्रामाणिक असल्याने माझा विचार पहिल्यांदा करा, असा आग्रही त्यांनी धरला. त्यानंतर कराडे यांनी अगदी शेवटच्या क्षणी आपला अर्जच मागे घेतला. त्यामुळे त्यांची कोणत्याच समितीवर वर्णी लागू शकली नाही.
आपल्याला स्थायी समितीचे सदस्य बनायचे होते. मात्र काही जिल्हा परिषद सदस्यांनी स्थायी समितीचे सदस्यत्व देण्यास नकार दिला व इतर समित्यांचे सदस्य बनण्याची विनंती केली. मात्र आपल्याला इतर समित्यांचे सदस्य बनण्यात रस नाही. त्यामुळे आपण कोणत्याच समितीसाठी अर्ज भरला नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ जि. प. सदस्य जगन्नाथ बोरकुटे यांनी लोकमतशी बोलताना दिली. समितीचे सदस्य नसल्याने सर्वसाधारण सभेत आवाज उठविण्यास आपल्याला संधी मिळाली आहे.