तेंदूपत्ता मजुरीसाठी ससेहाेलपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2021 05:00 AM2021-10-06T05:00:00+5:302021-10-06T05:00:39+5:30
वनविभागाने प्रलंबित बोनसची रक्कम तत्काळ लाभार्थ्यांना खात्यात जमा करण्याबाबत जि. प. सदस्य रुपाली पंदिलवार यांनी २५ सप्टेंबरला फोनवर उप वनसंरक्षक वनविभाग आलापल्ली यांच्याशी चर्चा केली. परंतु सदर रक्कम मजुरांच्या खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना ४ ऑक्टोबरला निवेदन देऊन लाभार्थ्यांना बोनस तत्काळ मिळून देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : जिल्ह्यातील सिंगणपल्ली, चौडमपल्ली, चपराळा, नागुलवाही, येल्ला गावातील नागरिकांनी येल्ला येथील तेंदुपत्ता संकलन केंद्रावर सन २०२० मध्ये विक्री केलेल्या तेंदुपत्ता बोनसची रक्कम प्रलंबित आहे. वर्ष लोटूनही आदिवासी बांधवांना ही रक्कम मिळाली नाही. सदर प्रलंबित असलेली बोनसची रक्कम मिळवून द्यावी अशी मागणी जि. प. सदस्य रूपाली पंदिलवार यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदनातून केली आहे.
वनविभागाने प्रलंबित बोनसची रक्कम तत्काळ लाभार्थ्यांना खात्यात जमा करण्याबाबत जि. प. सदस्य रुपाली पंदिलवार यांनी २५ सप्टेंबरला फोनवर उप वनसंरक्षक वनविभाग आलापल्ली यांच्याशी चर्चा केली. परंतु सदर रक्कम मजुरांच्या खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना ४ ऑक्टोबरला निवेदन देऊन लाभार्थ्यांना बोनस तत्काळ मिळून देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या कुटुंबांना शासकीय मदत मिळून देण्यात यावी, अशीही मागणी केलेली आहे. निवेदन देताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय पंदिलवार, देवा वनकर, आयुष्य पंदिलवार, रवी बामणकर उपस्थित होते.