दहावी पास सर्वांनाच मिळणार इयत्ता अकरावीत सहज प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:36 AM2021-07-29T04:36:26+5:302021-07-29T04:36:26+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : काेराेनामुळे यंदा इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली हाेती. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे इयत्ता दहावीचा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनामुळे यंदा इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली हाेती. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यावर्षी निकालाची टक्केवारी सुद्धा वाढली. आता अकरावीमध्ये प्रवेश घेण्याकरिता सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. गडचिराेली जिल्ह्यात इयत्ता अकरावीच्या जागा जास्त व दहावी उत्तीर्ण विद्यार्थी कमी अशी परिस्थिती असल्याने यंदाच्या शैक्षणिक सत्रात इयत्ता अकरावीच्या ७०० वर जागा शिल्लक राहणार आहेत. याचा फटका दुर्गम भागातील शाळांना बसणार आहे.
बाॅक्स .....
सीईटी वेबसाईट हॅंग
सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रासाठी इयत्ता अकरावी प्रवेशाकरिता सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) ११ ऑगस्ट राेजी आयाेजित करण्यात आली आहे. दहावी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर अर्ज भरण्याची सुविधा २० ते २६ जुलैदरम्यान उपलब्ध करून दिली हाेती. परंतु तांत्रिक कारणास्तव हे संकेतस्थळ सध्या बंद करण्यात आले आहे.
काेट ......
सीईटीची तयारी कशी कराल?
इयत्ता दहावीची परीक्षा ही वस्तुनिष्ठ प्रश्नांवर असते. परंतु सीईटी परीक्षा ही पर्यायी प्रश्नावर हाेणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दहावीच्या अभ्यासक्रमाची याेग्यरित्या तयारी करावी. पर्यायी प्रश्नांची तयारी केली पाहिजे. ही अकरावीच्या प्रवेशासाठी परीक्षा असून यापुढील सर्व परीक्षा पर्यायी प्रश्नांवर आधारित राहणार आहे. - प्रा. डाॅ. पंडित फुलझेले.