वाघाची दहशत वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 05:00 AM2020-07-01T05:00:00+5:302020-07-01T05:01:00+5:30
काटली ते कोडना-नवरगावच्या रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी शेतकरी व काही नागरिकांना वाघाचे जवळून दर्शन झाले. वडसा वनविभागाअंतर्गत पोर्ला वनपरिक्षेत्राच्या जंगलात गेल्या महिनाभरापासून चार ते पाच वाघांचा वावर असल्याचे दिसून येते. सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भडांगे यांची नवरगाव परिसरात शेतजमीन आहे. शेतीच्या कामासाठी त्यांचे या भागात आवागमन असते. दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्यांना वाघाने जवळून दर्शन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पोर्ला वनपरिक्षेत्राअंतर्गत नवरगाव व काटली रस्त्यालगतच्या जंगलात तीन ते चार वाघांचे दर्शन होत असल्याने या भागातील नागरिक धास्तावले आहेत. वाघाची दहशत वाढली असल्याने खरीप हंगामातील शेतीची कामे कशी करावी, असा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
काटली ते कोडना-नवरगावच्या रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी शेतकरी व काही नागरिकांना वाघाचे जवळून दर्शन झाले. वडसा वनविभागाअंतर्गत पोर्ला वनपरिक्षेत्राच्या जंगलात गेल्या महिनाभरापासून चार ते पाच वाघांचा वावर असल्याचे दिसून येते. सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भडांगे यांची नवरगाव परिसरात शेतजमीन आहे. शेतीच्या कामासाठी त्यांचे या भागात आवागमन असते. दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्यांना वाघाने जवळून दर्शन दिले.
खरीप हंगामातील धान पेरणी, रोवणी व इतर कामे बिनधास्तपणे होण्यासाठी वनविभागाने नवरगाव परिसरात फिरणाºया वाघांचा बंदोबस्त करावा, दहशत कमी करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी या भागातील अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.