सावरगाव परिसरात वाघांची दहशत वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 12:10 AM2020-01-05T00:10:06+5:302020-01-05T00:10:56+5:30

धानोरा-गडचिरोली मार्गावर सावरगावपासून गडचिरोलीकडे एक किमी अंतरावर ४ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास मुख्य मार्गापासून अवघ्या १० ते १५ मिटर अंतरावर दोन वाघ बसून असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 Terror of tigers increased in Savargaon area | सावरगाव परिसरात वाघांची दहशत वाढली

सावरगाव परिसरात वाघांची दहशत वाढली

Next
ठळक मुद्देधोका । मार्गाच्या बाजुला दोन तास ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : चातगाव वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या सावरगाव परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांना दोन वाघांचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धानोरा-गडचिरोली मार्गावर सावरगावपासून गडचिरोलीकडे एक किमी अंतरावर ४ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास मुख्य मार्गापासून अवघ्या १० ते १५ मिटर अंतरावर दोन वाघ बसून असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, बराच वेळ सदर वाघ बसून असल्याने अनेक नागरिकांना त्यांचे दर्शन झाले. वाघ असल्याची बातमी सभोवतालच्या परिसरातील गावांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. याबाबतची माहिती वन परिक्षेत्राधिकारी सोनडवले यांना देण्यात आली. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले असता, तोपर्यंत वाघ निघून गेले होते. धानोरा तालुक्यात शेकडो कर्मचारी गडचिरोलीवरून ये-जा करतात. ते रात्री उशीरापर्यंत दुचाकीने गडचिरोलीला जात असल्याने त्यांच्यात भिती निर्माण झाली आहे.

Web Title:  Terror of tigers increased in Savargaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.