चाचण्या वाढल्या, लसीकरणही वाढण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:38 AM2021-05-12T04:38:41+5:302021-05-12T04:38:41+5:30

काेराेनाच्या सुरुवातीच्या कालावधीत काेराेनाची लक्षणे दिसूनही नागरिक काेराेनाच्या चाचण्या करून घेत नव्हते. उलट गावातच उपचार करून घेण्यावर कल राहत ...

As tests increased, so did vaccinations | चाचण्या वाढल्या, लसीकरणही वाढण्याची गरज

चाचण्या वाढल्या, लसीकरणही वाढण्याची गरज

Next

काेराेनाच्या सुरुवातीच्या कालावधीत काेराेनाची लक्षणे दिसूनही नागरिक काेराेनाच्या चाचण्या करून घेत नव्हते. उलट गावातच उपचार करून घेण्यावर कल राहत हाेता. मात्र, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत काेराेनामुळे मृत्यू हाेणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे नागरिकांमध्ये काेराेनाची भीती निर्माण हाेऊन काेराेना चाचण्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. १ एप्रिल ते १० मे या कालावधीत सुमारे ५७ हजार ९१७ नागरिकांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. चाचण्या वाढल्याने रुग्णांचे वेळीच विलगीकरण करणे शक्य झाल्याने काेराेनाची लाट आटाेक्यात आणणे शक्य झाले आहे.

काेराेना चाचण्यांचे प्रमाण वाढले ही जमेची बाब आहे. त्याचबराेबर लसीकरणाची गती वाढविण्यासाठीही आराेग्य विभागाला मेहनत घ्यावी लागणार आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांमध्ये अजूनही लसविषयी गैरसमज असल्याने ते लस घेण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक केंद्रांवर लस पडून आहेत. हा गैरसमज दुर झाल्याशिवाय नागरिक लस घेणार नाहीत. नागरिकांमधील गैरसमज दूर करण्यासाठी आराेग्य विभागाला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.

बाॅक्स

सव्वा महिन्यात ३२ टक्के टेस्टिंग

काेराेच्या सुरुवातीपासून ते १० मेपर्यंत जिल्हाभरातील १ लाख ८२ हजार १५७ नागरिकांच्या रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १ एप्रिल ते १० मे या कालावधीत सुमारे ५७ हजार ९१४ नागरिकांच्या टेस्ट झाल्या आहेत. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ३१.७९ टक्के एवढे आहे.

बाॅक्स

१८ वर्षांवरील नागरिकांसाठी ग्रामीण भागात लसीकरण केंद्र वाढवा

१८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत उत्साह दिसून येत आहे. मात्र, या नागरिकांसाठी केवळ शहर व तालुकास्तरावरच लसीकरण केंद्रे ठेवण्यात आली आहेत. ग्रामीण भागातही लसीकरण केंद्र वाढविण्याची गरज आहे.

बाॅक्स

ग्रामीण भागात काॅन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा

१ एखादा रुग्ण आढळून आल्यानंतर यापूर्वी आराेग्य विभाग काॅन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवत हाेता. आता मात्र काॅन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम पूर्णपणे ठप्प पडले आहे.

२ ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये लसविषयी जनजागृती निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याची गरज आहे.

बाॅक्स

१ एप्रिल ते १० मे या कालावधीत झालेल्या रॅट चाचण्या

तालुका चाचण्या रुग्ण

अहेरी ५८३२ १०३२

आरमाेरी ४९६२ ९४७

भामरागड १७२८ ३७७

चामाेर्शी ७८१७ ९२१

धानाेरा ३०५४ ५२०

एटापल्ली ३४९६ ६४८

गडचिराेली १०५८७ २९०४

काेराची २६५६ ५३०

कुरखेडा ३८७६ ७४६

मुलचेरा ३३९९ ४२२

सिराेंचा ३६५८ ५९६

देसाईगंज ६६०६ १०७३

एकूण ५७,९१४ १०,७१६

एकूण रुग्ण-

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - ३६३९

गृहविलगीकरणातील रुग्ण - २२०२

गडचिराेली शहरातील रुग्ण - १२३६

बरे हाेण्याचे प्रमाण - ८३.८१

बाॅक्स (लसीकरण)

आराेग्य कर्मचारी - ८५८२

फ्रंटलाईन वर्कर - १८,६४८

ज्येष्ठ नागरिक - २५,०५१

४५ ते ५९ - ३०,४५९

१८ ते ४४ - ८११२

Web Title: As tests increased, so did vaccinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.