अतिक्रमित एकतानगर झोपडपट्टीवर प्रशासनाने पुन्हा चालविला बुलडोजर; अनेक झोपड्या उद्ध्वस्त

By दिलीप दहेलकर | Published: June 21, 2023 03:50 PM2023-06-21T15:50:11+5:302023-06-21T15:51:17+5:30

प्रकरण न्यायप्रविष्ठ तरीही केली कारवाई

The administration again drove the bulldozer on the encroached Ektanagar slum of gadchiroli | अतिक्रमित एकतानगर झोपडपट्टीवर प्रशासनाने पुन्हा चालविला बुलडोजर; अनेक झोपड्या उद्ध्वस्त

अतिक्रमित एकतानगर झोपडपट्टीवर प्रशासनाने पुन्हा चालविला बुलडोजर; अनेक झोपड्या उद्ध्वस्त

googlenewsNext

गडचिरोली : शहराच्या गाेकुलनगरातील देवापूर रिठ सर्वे नंबर ७८ व ८८ येथील तलावातील अतिक्रमीत एकतानगर झोपडपट्टीबाबतचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरू आहे. अतिक्रमणधारकांनी आपल्या न्याय हक्कासाठी न्यायालयात रिठ याचिका दाखल केली असून याबाबतच्या सुनावण्या सुरू आहेत. दरम्यान नगर परिषद प्रशासनाने तगड्या बंदोबस्तात २१ जुन राेजी बुधवारला सकाळच्या सुमारास सदर झोपडपट्टीवर बुलडोजर चालविला.

दरम्यान जेसीबी, पोकलॅन्ड, ट्रॅक्टर, अग्निशमन दल तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहनांसह पाोलिस बंदोबस्त व प्रशासनाचा प्रचंड फौजफाटा येथे दाखल झाला. येथील झोपड्या बुलडोजरच्या सहाय्याने पाडण्यात आल्या. दरम्यान कवेलू, फाटे व इतर साहित्यांची नासधूस झाली. काही अतिक्रमणधारकांनी कसेबसे आपले संसारपयोगी साहित्य बाहेर काढले. तर काही जणांना असे साहित्य काढण्याची संधीही मिळाली नाही.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करणाऱ्या तसेच अडचण होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने येथील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी तसेच अतिक्रमणधारक मिळून ८० पेक्षा अधिक नागरिकांना पोलिस मुख्यालयाच्या परिसरात नजरकैदेत ठेवले. सकाळी १० : ३० वाजतापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत अतिक्रमणधारक व आंदोलक पोलिसांच्या नजरकैदेत होते.

Web Title: The administration again drove the bulldozer on the encroached Ektanagar slum of gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.