प्रशासन म्हणते जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये पिकांची स्थिती उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2022 10:39 PM2022-10-11T22:39:40+5:302022-10-11T22:40:19+5:30

गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ६८९ गावे आहेत. खरीप पिकांची गावे १ हजार ५४८ आहेत. खरीप गावांमध्ये पिके नसलेली गावे ४५ आहेत.  खरीप पीक असलेल्या गावांपैकी ५० पैशाच्या आत पैसेवारी असलेले एकही गाव नाही. १ हजार ५११ गावांची पैसेवारी ५० पैशांच्यावर वर आहे. गडचिरोली जिल्ह्याची खरीप हंगामाची हंगामी पैसेवारी ही ६८ आहे. असे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे. यावरून पिकांची स्थिती उत्तम असल्याचे दिसून येत आहे. 

The administration says that the condition of crops in all the villages of the district is good | प्रशासन म्हणते जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये पिकांची स्थिती उत्तम

प्रशासन म्हणते जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये पिकांची स्थिती उत्तम

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तहसीलदार यांचेकडून माहिती संकलीत करून गडचिरोली जिल्ह्याची सन २०२२-२०२३  या वर्षांची खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सर्वच गावांतील पिकांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा अधिक दाखविण्यात आली आहे. यावरून पिकांची स्थिती चांगली असल्याचा अंदाज आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ६८९ गावे आहेत. खरीप पिकांची गावे १ हजार ५४८ आहेत. खरीप गावांमध्ये पिके
नसलेली गावे ४५ आहेत.  खरीप पीक असलेल्या गावांपैकी ५० पैशाच्या आत पैसेवारी असलेले एकही गाव नाही. १ हजार ५११ गावांची पैसेवारी ५० पैशांच्यावर वर आहे. गडचिरोली जिल्ह्याची खरीप हंगामाची हंगामी पैसेवारी ही ६८ आहे. असे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे. यावरून पिकांची स्थिती उत्तम असल्याचे दिसून येत आहे. 

नदीकाठचे शेत पडीक तरीही पैसेवारी ५० पैसेच्यावर
प्राणहिता, गाेदावरी, वैनगंगा, पर्लकाेटा, पामुलगाैतम, इंद्रावती या मुख्य नद्यांसह इतरही नद्यांना तीन ते चारवेळा पूर आला. पुराची माती अनेकांच्या शेतात जमा झाली आहे. दाेन ते तीन वेळा राेवणी केल्यानंतरही पूर आला. त्यामुळे अनेकांचे शेत आता पडीक आहेत. तरीही या गावांमधील पैसेवारी ५० पैशांच्यावर दाखविली आहे. 

धानपीक जाेमात
खरीप हंगामात सुमारे ९० टक्के क्षेत्रावर धानपिकाची लागवड केली जाते. अगदी सुरूवातीपासून जिल्ह्यात पाऊस पडत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नव्हती, अशाही शेतकऱ्यांचे धान डाेलत आहे. ऑक्टाेबर महिन्यातही पाऊस झाल्याने तलाव, बाेड्यांच्या पाण्याची गरज न पडताच पीके निघाली आहेत. पुढे वातावरण चांगले राहिल्यास धानपिकाचे चांगले उत्पादन हाेऊन असा अंदाज कृषी विभागामार्फत व्यक्त केला जात आहे.

प्राथमिक अंदाज

हंगामी पैसेवारी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी जाहीर केली जाते. यामध्ये पीक परिस्थितीचा प्राथमिक आढावा राहते. त्यामुळे या पैसेवारीला हंगामी पैसेवारी समजले जाते. कारण शेतात पीके अजूनही उभे आहेत. आता जरी पिकांची स्थिती चांगली असली तरी पुढे एखादा राेग, पूर, अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे पिकांचे नुकसान हाेऊ शकते. त्यामुळे हंगामी पैसेेवारीला फारसे महत्त्व नाही. ही पैसेवारी केवळ अंदाज आहे. 
डिसेंबर ते जानेवारी महिन्यात अंतिम पैसेवारी जाहीर केली जाते. यावेळी खरीप पिके निघाली असतात. या पैसेवारीवरूनच जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा अंदाज येताे. त्यानुसार शासन संबंधित जिल्ह्यासाठी याेजना लागू करते. 

 

Web Title: The administration says that the condition of crops in all the villages of the district is good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.