नक्षलचळवळीचा रक्तरंजित इतिहास तीन भाषांमध्ये होणार शब्दबद्ध

By संजय तिपाले | Published: July 26, 2023 12:55 PM2023-07-26T12:55:17+5:302023-07-26T13:15:23+5:30

पत्रक काढून घोषणा: वरिष्ठ नेत्यांचे चरित्र, आगामी रणनितीचीही दिशा

The bloody history of Naxal movement will be verbatim in three languages | नक्षलचळवळीचा रक्तरंजित इतिहास तीन भाषांमध्ये होणार शब्दबद्ध

नक्षलचळवळीचा रक्तरंजित इतिहास तीन भाषांमध्ये होणार शब्दबद्ध

googlenewsNext

संजय तिपाले

गडचिरोली: डाव्या विचारसरणीच्या कडव्या माओवादी संघटनांनी चालविलेल्या नक्षलचळवळीचा आतापर्यंचा रक्तरंजित प्रवास पुस्तकस्वरुपात जगासमोर येणार आहे. इंग्रजी, हिंदी व तेलगू अशा तीन भाषांमध्ये लवकरच चळवळीतील वरिष्ठ नेत्यांचे चरित्र प्रकाशित होणार आहे. यातून आगामी रणनितीही ठरण्याची शक्यता आहे. २६ जुलैला भारत कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)केंद्रीय कमिटीचा प्रवक्ता अभय याने पत्रक काढून याची घोषणा केली.

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) २ सीपीआय (माओवादी) च्या शहीद केंद्रीय समिती सदस्यांच्या चरित्रांचे संकलन केंद्रीय समितीद्वारे इंग्रजी, हिंदी आणि तेलगू या तीन भाषांमध्ये प्रकाशित होणार आहे. संघटनेचा संस्थापक कॉम्रेड सीएम आणि कॉम्रेड के.सी. याने पुकारलेल्या दीर्घकालीन जनयुद्धाचा प्रवास येणाऱ्या पिढ्यांना कळावा, यासाठी १९६७ पासून आतापर्यंतची वाटचाल पुस्तकस्वरुपात येणार आहे. दरम्यान, नक्षली चळवळीत देशभरात १४ हजार ८०० हून अधिक कॉम्रेड्सनी आपले  प्राण दिले, त्यात ११६९ महिला कॉम्रेडचा समावेश आहे. कॉम्रेड चारू मजुमदार आणि कॉम्रेड कन्हाई चॅटर्जीसह ४१ आघाडीचे कॉम्रेड यांचे यात योगदान आहे. या सर्वांचे संक्षिप्त जीवनचरित्र प्रकाशित केले जाणार आहे. 
गेल्या १८ वर्षांपासून जागतिक समाजवादी क्रांतीसाठी अंतर्गत भारतात नवीन लोकशाही क्रांती यशस्वी करण्याच्या उद्देशाने ४ हजार ६८६ कॉम्रेड शहीद झाले. यामध्ये ८५६ महिला कॉम्रेडचा समावेश आहे. यानिमित्ताने आदरांजली अर्पण करून, शोषण-दडपशाही आणि साम्यवादापासून मुक्त समाजाची स्थापना करण्याची शपथ घेतली जाणार आहे.

नक्षलसप्ताहाच्या सुरुवातीलाच घोषणा

दरम्यान, २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान शहीद सप्ताह होत आहे. या सप्ताहाच्या सुरुवातीलाच माओवाद्यांच्या केंद्रीय कमिटीने नक्षलचळवळीच्या रक्तरंजित थराराचा इतिहास उलगडणारे तीन भाषांतील पुस्तक प्रकाशित करण्याची घोषणा केल्याने गुप्तचर यंत्रणेसह पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे. या पुस्तकाची उत्सुकता आहे.
 

Web Title: The bloody history of Naxal movement will be verbatim in three languages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.