सिराेंचातील ‘कलेक्टर’ नागपूर-पुण्यात झाडताेय ‘राैब’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 10:33 AM2023-04-11T10:33:21+5:302023-04-11T10:34:58+5:30

गाेडवा अन् दराराही : सीमावर्ती भागातील फळांची क्रेझ तीन राज्यांत

The 'Collector Mango' of Sironcha is attracting Nagpur-Pune people | सिराेंचातील ‘कलेक्टर’ नागपूर-पुण्यात झाडताेय ‘राैब’

सिराेंचातील ‘कलेक्टर’ नागपूर-पुण्यात झाडताेय ‘राैब’

googlenewsNext

सिरोंचा (गडचिराेली) : मार्च महिन्यापासूनच विविध प्रकारच्या आंब्यांनी बाजारपेठ व्यापते; लहान-माेठ्या आकाराचे हे आंबे असतात. त्यांचा आकार, गाेडवा व नावांनी ते ग्राहकांना आकर्षित करतात. गडचिराेली जिल्ह्यात तसे बाहेरचेच आंबे येेतात; परंतु जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातूनही राज्यातील विविध भागातील बाजारातआंबा पाठविला जाताे, ताे म्हणजे कलेक्टर आंबा. सिराेंचातील कलेक्टर आंब्याची क्रेज नागपूर-पुण्यासारख्या माेठ्या शहरांमध्ये असून गाेडवा, माेठा आकार आदी गुणांमुळे ताे आपला राैफ म्हणजेच रुबाब झाडत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यात कलेक्टर आंब्याच्या बागा आहेत. हा आंबा सर्व आंब्यांपेक्षा आकारात मोठा व वजनानेही जड आहे. आंब्यात गाेडवासुद्धा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागपूर, पुणे यासारख्या माेठ्या शहरांसह लहान शहरातील ग्राहक कलेक्टर आंबा खरेदीकडे ओढले जातात. काही जण तर फाेनवर संपर्क साधून आंबा मागवतात. तर काही व्यापाऱ्यांच्या माध्यमातून हा आंबा परजिल्ह्यांमध्ये पुरविला जाताे. महाराष्ट्रसह तेलंगणा व आंध्र प्रदेशातही हा आंबा पाेहाेचविला जाताे.

कुठून आला ‘कलेक्टर’?

ब्रिटिश राजवटीत पश्चिम गोदावरीचे तत्कालीन कलेक्टर ग्लासफाेर्ड यांनी बाहेरून आंब्याची कलम आणून या भागात म्हणजेच सिराेंचा परिसरात लावली. कलेक्टरने कलम लावल्यामुळे हा आंबा कलेक्टर नावाने प्रसिद्ध झाला. सिराेंचा भागात बेगनपल्ली, दशेरी, लंगडा, तोतापरी, केसर आदी प्रजातींचे आंबे बाजारात आहेत; परंतु कलेक्टर आंबा हा आकर्षणाचे केंद्र ठरताे.

आंब्याचे वजन व दर काय?

कलेक्टर आंब्याचे फळ पूर्ण वाढ झाल्यानंतर दीड ते दाेन किलाेपर्यंत वजनाचे असते. प्रतिकिलाे १५० ते २०० रुपये दर याप्रमाणे आंबा विक्री केला जाताे. त्या काळात जेव्हा झाडाला पहिल्यांदाच आंबे लागले, तेव्हा आंब्याचा आकार पाहून नागरिक आश्यर्यचकीत झाले हाेते, असे जुणे जाणकार सांगतात.

पुलांनी ताेडली विक्री मर्यादेची बंधने

सिरोंचा येथील प्राणहिता व गोदावरी नदीवर पूल बांधकाम झाल्यापासून येथील कलेक्टर आंबा तेलंगणा व आंध्र प्रदेशात थेट जाऊ लागला. पूल बांधकामांमुळे कलेक्टरच्या विक्रीवरील सीमेच्या मर्यादेची जी बंधने हाेती ती तुटली. महाराष्ट्रासह तेलंगणा व आंध्र प्रदेशातही कलेक्टर आंबा पाेहाेचत आहे.

Web Title: The 'Collector Mango' of Sironcha is attracting Nagpur-Pune people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.