10 तालुक्यात 27 ग्रामपंचायतींमध्ये वाजला सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 10:31 PM2022-11-10T22:31:44+5:302022-11-10T22:32:14+5:30
मतदान १८ डिसेंबर २०२२ रोजी रविवारला सकाळी ७.३० वाजतापासून दुपारी ३ पर्यंत होणार असून मतमोजणी २० डिसेंबरला होणार आहे. मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना २३ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील २७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांच्या आदेशान्वये हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
मतदान १८ डिसेंबर २०२२ रोजी रविवारला सकाळी ७.३० वाजतापासून दुपारी ३ पर्यंत होणार असून मतमोजणी २० डिसेंबरला होणार आहे. मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना २३ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
या निवडणूक प्रक्रियेत मतदारांनी कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी केले आहे.
मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतीकरिता आयोगाने सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातील १२ पैकी १० तालुक्यांतील २७ ग्रामपंचायतीकरिता निवडणूक होणार आहे. त्यात सदस्य पदासह थेट सरपंचांची ही निवड मतदारांकडून केली जाणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक : शुक्रवार, १८ नोव्हेंबर, नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ दिनांक : २८ नोव्हेंबर २०२२ ते ०२ डिसेंबर २०२२, वेळ : सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत, नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) दिनांक ५ डिसेंबर २०२२, वेळ सकाळी ११ वाजतापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी)- दिनांक ७ डिसेंबर दुपारी ३ पर्यंत, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ : दिनांक ७ डिसेंबर दुपारी ३ वाजता नंतर. ही सर्व प्रक्रिया संबंधित तहसील कार्यालयाच्या ठिकाणी होणार आहे.