महागाईचा राक्षस जागा झाला; गॅस सिलिंडर 1006 रुपयांना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 05:00 AM2022-03-25T05:00:00+5:302022-03-25T05:00:49+5:30

जानेवारी २०२१ मध्ये घरगुती वापराच्या सिलिंडरची किमत ७५० रुपये हाेती. त्यानंतर सातत्याने सिलिंडरच्या दरात वाढ हाेत हाेती. मात्र ऑक्टाेबर महिन्यापासून सिलिंडरचे दर स्थिर हाेते. ऑक्टाेबर महिन्यात सिलिंडर ९५६ रुपयांना मिळत हाेता. हा दर सुमारे सहा महिने कायम हाेता. २२ मार्च राेजी दरात एकदम ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गडचिराेली शहरात सिलिंडरचा दर आता १००६ रुपये झाला आहे. केवळ गॅससाठी एवढी माेठी रक्कम माेजणे अनेक कुटुंबांना अशक्य झाले आहे. 

The monster of inflation woke up; Gas cylinder at Rs 1006! | महागाईचा राक्षस जागा झाला; गॅस सिलिंडर 1006 रुपयांना !

महागाईचा राक्षस जागा झाला; गॅस सिलिंडर 1006 रुपयांना !

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : पाच राज्यांतील निवडणुका संपताचा केंद्र शासनाने गॅस सिलिंडरचे दर वाढविले आहेत. २२ मार्चपासून घरगुती वापराच्या सिलिंडरवर ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ९५६ रुपयांना मिळणारे सिलिंडर आता १००६ रुपयांना मिळत आहे. 
जानेवारी २०२१ मध्ये घरगुती वापराच्या सिलिंडरची किमत ७५० रुपये हाेती. त्यानंतर सातत्याने सिलिंडरच्या दरात वाढ हाेत हाेती. मात्र ऑक्टाेबर महिन्यापासून सिलिंडरचे दर स्थिर हाेते. ऑक्टाेबर महिन्यात सिलिंडर ९५६ रुपयांना मिळत हाेता. हा दर सुमारे सहा महिने कायम हाेता. २२ मार्च राेजी दरात एकदम ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गडचिराेली शहरात सिलिंडरचा दर आता १००६ रुपये झाला आहे. केवळ गॅससाठी एवढी माेठी रक्कम माेजणे अनेक कुटुंबांना अशक्य झाले आहे. 
उज्ज्वला गॅस याेजनेअंतर्गत ज्या कुटुंबांनी गॅस खरेदी केली, त्यांना आता भरणे कठीण झाले असल्याचे दिसून येत आहे. 

चूल पेटविता येईना, गॅस परवडेना
गॅसच्या सततच्या वापरामुळे अनेक महिलांना आता चूल पेटविण्याचा त्रास येत आहे. शहरात चुलीसाठी सरपण कुठून आणायचे व ते कुठे ठेवायचे असा प्रश्न आहे. त्यामुळे सिलिंडर कितीही महाग झाला तरी त्यांना सिलिंडरचाच वापर करावा लागते. ग्रामीण भागात मात्र गॅसऐवजी सिलिंडरचा वापर केला जात आहे.  

गॅससाठी हजार रुपये कसे परवडतील  

काेराेनामुळे अनेकांचे व्यवसाय बुडाले आहेत. ज्यांचे राेजगार टिकून आहेत. त्यांना पगारवाढ मिळालेली नाही. अशा परिस्थितीत प्रत्येक वस्तूच्या किमती वाढत चालल्या आहेत. काही कुटुंबांचा महिन्याचा किराणा दाेन हजार रुपयांचा हाेते. अशा स्थितीत केवळ गॅससाठी एक हजार रुपये माेजणे कठीण आहे. 
- रत्नमाला मडावी, गृहिणी

सबसिडी नावालाच 

१ प्रतिसिलिंडर ४० रुपये सबसिडी जमा केली जाते. मात्र काही नागरिकांच्या खात्यात ही सबसिडी जमा हाेत नसल्याची तक्रार आहे. 
२ गॅसचे दर आता आवाक्याबाहेर गेल्याने ग्रामीण भागातील महिला आता पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करीत असल्याचे दिसून येत आहे. 

Web Title: The monster of inflation woke up; Gas cylinder at Rs 1006!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.