सूर्य ओकतेय आग, जरा जपून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 05:00 AM2022-05-30T05:00:00+5:302022-05-30T05:00:31+5:30

रविवारी तापमान ४२ अंशांपर्यंत पाेहाेचले. या रखरखत्या उन्हात घराबाहेर पडणे शक्य नसल्याने, दुपारी १२ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत गडचिराेली शहरातील रस्ते ओस पडल्यागत दिसून येत आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात माेठ्या प्रमाणात वाढ हाेते. त्यामुळे २५ तारखेनंतरच्या दिवसांना नवतपा असे संबाेधल्या जाते. या नवतपांपैकी चार ते पाच दिवस अत्यंत कडक उन्ह राहते.

The sun is blazing, just be careful | सूर्य ओकतेय आग, जरा जपून

सूर्य ओकतेय आग, जरा जपून

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : ढगाळ वातावरण नाहीसे हाेऊन आकाश निरभ्र झाल्याने, मागील दाेन दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. रविवारी तापमान ४२ अंशांपर्यंत पाेहाेचले. या रखरखत्या उन्हात घराबाहेर पडणे शक्य नसल्याने, दुपारी १२ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत गडचिराेली शहरातील रस्ते ओस पडल्यागत दिसून येत आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात माेठ्या प्रमाणात वाढ हाेते. त्यामुळे २५ तारखेनंतरच्या दिवसांना नवतपा असे संबाेधल्या जाते. या नवतपांपैकी चार ते पाच दिवस अत्यंत कडक उन्ह राहते. त्यामुळे तापमानात वाढ हाेते. चार दिवसांपूर्वी काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला, तसेच ढगाळ वातावरण असल्याने तापमान ४० अंशांपर्यंत पाेहाेचले हाेते. शनिवारपासून आकाश निरभ्र झाले.

 काय काळजी घ्यावी 

-    सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असते. त्यामुळे या कालावधीत शक्यताे उन्हात फिरणे, काम करणे किंवा खेळणे टाळावे. 
-    साैम्य रंगाचे सैल कपडे वापरावे, टाइट जिन्स आणि भडक कपडे वापरू नयेत. डाेक्यावर रुमाल किंवा स्कार्प बांधावा. तहान लागण्याची वाट न पाहता पाणी प्यावे. नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लस्सी, लिंबूपाणी घ्यावे. 

पुन्हा आठ दिवस उष्णतेचे
मान्सूनचे वेळेवर आगमन न झाल्यास पुन्हा आठ दिवस तापमान ४० अंशांच्या वरच राहणार आहे. पाऊस झाल्यानंतरही वातावरणातील दमटपणा त्रासवून साेडणार आहे. त्यामुळे उन्हापासून काळजी घेण्याची गरज आहे.

११ नंतर काम बंद

ग्रामीण भागात शेतीपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. सकाळी ९ वाजल्यानंतरच उकड उन्ह पडत असल्याने,  सकाळच्या सुमारास कामे उरकण्याला शेतकरी प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. 
सकाळी ६ वाजता शेतात पाेहाेचून ११ वाजेपर्यंत कामे केली जातात. त्यानंतर, घराकडे परत येतात. 
शहरात बांधकाम मजूर सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत काम करतात. त्यानंतर कायमची सुटी घेतली जाते. 

उष्माघाताचा धाेका
बाहेरचे तापमान प्रमाणाबाहेर वाढले की, शरीरातील तापमान नियंत्रण करणारी यंत्रणा काेलमडते, अशा व्यक्तीला उष्माघात म्हणजेच हिटस्ट्राेक किंवा सन स्ट्राेक हाेताे. ही जीवघेणी अवस्था आहे. वातावरणातील जास्त तापमान किंवा खूप वेळ उन्हामध्ये शारीरिक कष्ट केल्याने ही अवस्था निर्माण हाेते. उष्माघातामुळे मृत्यू ओढवताे. 

 

Web Title: The sun is blazing, just be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.