रानटी हत्तीचा थरार; पंचनाम्यासाठी गेलेल्या चालकाला सोंडेत उचलून आपटले, पळसगाव उपक्षेत्रातील घटना

By गेापाल लाजुरकर | Published: September 16, 2023 08:59 PM2023-09-16T20:59:44+5:302023-09-16T21:00:25+5:30

पळसगाव उपवनक्षेत्रातील या घटनेने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.

The thrill of a wild elephant A driver who went for panchanama was picked up and hit by a trunk, an incident in Palasgaon sub-area | रानटी हत्तीचा थरार; पंचनाम्यासाठी गेलेल्या चालकाला सोंडेत उचलून आपटले, पळसगाव उपक्षेत्रातील घटना

रानटी हत्तीचा थरार; पंचनाम्यासाठी गेलेल्या चालकाला सोंडेत उचलून आपटले, पळसगाव उपक्षेत्रातील घटना

googlenewsNext

गडचिराेली : आरमोरी वनपरिक्षेत्रात वाघांच्या हल्ल्यात महिलेचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच १६ सप्टेंबरला नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सहायक वनसरंक्षकांसमवेत गेलेला वनविभागाचा चालक रानटी हत्तीणीच्या तावडीत सापडला. यावेळी हत्तीने त्यास सोंडेत पकडून आदळले, त्यानंतर उचलून दूर फेकले. यात चालक जागीच ठार झाला. पळसगाव उपवनक्षेत्रातील या घटनेने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.

सुधाकर आत्राम (५०) असे शहीद वाहनचालकाचे नाव आहे. गेल्या आठ दिवसांपासून पळसगाव उपक्षेत्रात १९ रानटी हत्तींच्या कळपाचा वावर आहे. महादेव गड पहाडीच्या कक्ष क्रमांक ८५ मध्ये आगमन होताच सुरक्षा आणि सतर्कता बाळगण्यासाठी वन विभागाची चमू हत्तीचा वावर असलेल्या परिसरात दाखल झाली हाेती. सहायक वनसंरक्षक संदीप भारती हे आपल्या वाहनाने याच भागात दाखल झाले हाेते. तेव्हा वाहन बाजूला ठेवून वन कर्मचाऱ्यांसोबत कर्तव्य बजावत असताना अचानक आलेल्या रानटी हत्तिणीने सुधाकर आत्राम यांना उचलून आपटले व पुन्हा रस्त्यावरून जंगलात नेऊन फेकले. त्यामुळे आत्राम यांचे शरीर छिन्नविछिन्न होऊन जागीच गतप्राण झाले. घटनेनंतर वन कर्मचारी हत्तिणीला पिटाळून लावले. त्यानंतर आत्राम यांचा मृतदेह देसाईगंज येथे शवविच्छेदनासाठी पाठविला. यावेळी सहायक वन संरक्षक संदीप भारती, आरमाेरीचे वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, क्षेत्र सहायक मुखरु किनेकर, वनरक्षक शिऊरकर, बाळू अतकरे, रुपा सहारे तसेच वनमजूर व नागरिक उपस्थित होते.

रानटी हत्तींच्या कळपावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच त्यांना मानवी वस्तीपासून दूर पळवण्यासाठी पश्चिम बंगाल राज्यातील एनजीओ हुल्ला टीमचे सेन गुप्ता यांच्याशी संपर्क झाला असून ते १७ सप्टेंबर रोजी सकाळी वडसा वन विभागातील रानटी हत्तींच्या कळपाचा प्रतिकार करण्यासाठी आपल्या टीमसह येत आहेत.
- अविनाश मेश्राम, वनपरिक्षेत्र अधिकारी आरमोरी
 

Web Title: The thrill of a wild elephant A driver who went for panchanama was picked up and hit by a trunk, an incident in Palasgaon sub-area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.