वाघ त्यांच्याकडे पहात होता अन् ते वाघाकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 05:00 AM2022-03-16T05:00:00+5:302022-03-16T05:00:35+5:30

सलमाला येथील मुखरू कुमरे (७० वर्षे) हे मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्यादरम्यान सालमारा ते कनेरी रस्त्यावरून सायकलने आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी आरमोरीला जात होते. त्याचवेळी वन तलावाजवळच्या रस्त्यावर अचानक त्यांच्या सायकलपुढे पट्टेदार वाघ अवतरला. त्यामुळे कुमरे यांची चांगलीच भंबेरी उडाली. त्यांनी कशीबशी सायकल थांबवत मोहफुलाच्या झाडाजवळ सायकल फेकून दिली. स्वतः झाडाच्या बुंध्याच्या आश्रयाने उभे राहिले.

The tiger was looking at them and finally at the tiger! | वाघ त्यांच्याकडे पहात होता अन् ते वाघाकडे !

वाघ त्यांच्याकडे पहात होता अन् ते वाघाकडे !

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
जोगीसाखरा : सालमारा ते कनेरी मार्गावर सायकलने जात असताना अचानक समोर वाघ आला. त्यामुळे भंबेरी उडालेल्या त्या वृद्ध व्यक्तीने साक्षात मृत्यूचे दर्शन झाल्याचा अनुभव घेतला.
सलमाला येथील मुखरू कुमरे (७० वर्षे) हे मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्यादरम्यान सालमारा ते कनेरी रस्त्यावरून सायकलने आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी आरमोरीला जात होते. त्याचवेळी वन तलावाजवळच्या रस्त्यावर अचानक त्यांच्या सायकलपुढे पट्टेदार वाघ अवतरला. त्यामुळे कुमरे यांची चांगलीच भंबेरी उडाली. त्यांनी कशीबशी सायकल थांबवत मोहफुलाच्या झाडाजवळ सायकल फेकून दिली. स्वतः झाडाच्या बुंध्याच्या आश्रयाने उभे राहिले.
वाघ आणि त्यांच्यात अवघ्या १५ फुटांचे अंतर होते. ते एकमेकांकडे ५ ते १० मिनिटे बघत राहिले. आता आपला मृत्यू अटळ आहे असे कुमरे यांना वाटत असतानाच वाघ हळूहळू तेथून निघून गेला. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, या उक्तीचा प्रत्यय त्यांना आला. 

कुंपणामुळे निर्माण झाला धोका?
सलमाला, कनेरी या भागातील जंगलात वाघाचे आणि वन्य प्राण्यांचे वास्तव्य असल्यामुळे नेहमीच वाघाची दहशत असते. वन विभागाने विकास कामाच्या नावाखाली जंगलांना चेन लिंक फेन्सिंग केल्यामुळे वन्यप्राण्यांच्या आणि मानवाच्या अस्तित्वाला मोठा धोका निर्माण झाला आहे. वन्यप्राण्यांकडून मनुष्यहानी आणि नरबळी जाण्यापूर्वी वन विभागाने वाघांपासून संरक्षण मिळण्यासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: The tiger was looking at them and finally at the tiger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ