पत्नी वाघाच्या जबड्यात अन् पती कुऱ्हाड घेऊन धावला शेतातून नेले फरफटत, गडचिराेली तालुक्याच्या आंबेटाेलातील घटना

By गेापाल लाजुरकर | Published: December 26, 2022 07:26 PM2022-12-26T19:26:48+5:302022-12-26T19:26:56+5:30

वन विभागाने मज्जाव केल्यानंतर लाेकांनी जंगलात जाणे बंद केले. परंतु आता थेट लाेकांच्या शेतात शिरून त्यांच्यावर वाघ हल्ले करील आहेत.

The wife in the jaws of the tiger and the husband with the ax ran away from the field | पत्नी वाघाच्या जबड्यात अन् पती कुऱ्हाड घेऊन धावला शेतातून नेले फरफटत, गडचिराेली तालुक्याच्या आंबेटाेलातील घटना

पत्नी वाघाच्या जबड्यात अन् पती कुऱ्हाड घेऊन धावला शेतातून नेले फरफटत, गडचिराेली तालुक्याच्या आंबेटाेलातील घटना

Next

गडचिराेली : वन विभागाने मज्जाव केल्यानंतर लाेकांनी जंगलात जाणे बंद केले. परंतु आता थेट लाेकांच्या शेतात शिरून त्यांच्यावर वाघ हल्ले करील आहेत. शुक्रवार २३ डिसेंबर राेजी राजगाटा माल गावची महिला ठार झाल्याची घटना ताजी असतानाच त्याच परिसरातील आंबेटाेला येथे एका शेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला केला व तिला जबड्यात पकडून फरफटत नेले; परंतु आपल्या जीवाची पर्वा न करता कुऱ्हाड घेऊन पतीने वाघाचा पाठलाग केला व तिला वाघाच्या जबड्यातून साेडविले. सध्या ही महिला अत्यंत गंभीर जखमी आहे.

मंगला प्रभाकर काेहपरे (५०) रा. आंबेटाेला ता. जि. गडचिराेली असे वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रभाकर काेहपरे हे त्यांचे आंबेशविणीतील मामा म्हस्के यांची शेती गेल्या काही वर्षांपासून कसत आहेत. सध्या शेतात असलेली लाखाेळी व तुरींची देखभाल करण्यास तसेच वठलेले (वाळलेले) झाड ताेडण्यासाठी ते शेतात साेमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गेले. ही शेती राजगाटा जंगल क्षेत्रालाच लागून आहे. सुरूवातीला प्रभाकर हे झाडावर चढले तर मंगला ही झाडाखाली हाेती. प्रभाकर हे वाळलेल्या झाडाच्या फांद्या ताेडत हाेते. तर मंगला ही त्या फांद्या जमा करीत हाेती. त्यांचे काम सुरू असतानाच दुपारी १: ३० वाजताच्या सुमारास राजगाटा जंगल क्षेत्रातूनच वाघ जंगलात आला व त्याने मंगलावर मागील बाजूने हल्ला करीत जबड्यात मान पकडली व फरफटत नेले. ही घटना प्रभाकर यांच्या लक्षात येताच तातडीने झाडावरून उतरत त्यांनी खाली उडी मारली.

यात त्यांनाही ओरपडे गेले. लगेच त्यांनी कुऱ्हाड पकडून वाघाचा पाठलाग केला. ताेपर्यंत वाघ झाडापासून तीन बांध्या ओलांडून गेला हाेता. प्रभाकर यांनी माेठी हिंमत करून आरडाओरड करून वाघावर चाल केली. हे पाहताच वाघाने जबडा सैल करून मंगलाला बांधीतच टाकून दिले व ताे जंगलाच्या दिशेने पसार झाला. परंतु यासाठी प्रभाकर यांना माेठी हिंमत दाखवावी लागली. काही वेळेतच परिसरातील लाेक घटनास्थळी गाेळा झाले. त्यानंतर माहिती गावातून देऊन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळविले. मंगला ही वाघाच्या जबड्यातून बचावली असली तरी तिची प्रकृती अत्यंत गंभीर असून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे.

हरणाचा पाठलाग

मंगला व प्रभाकर हे शेतात पाेहाेचल्यानंतर जे झाड ताेडणार हाेते. तेेथेच खाली काही क्षण बसून पाणी पित हाेते. याचवेळी त्यांना एक हरीण पळताना दिसले. परंतु त्याच्या मागे कुठलेली अन्य जनावर नव्हते. पाणी पिल्यानंतर काही वेळेतच प्रभाकर हे झाडावर चढले तर मंगला ह्या झाडाखाली हाेत्या. कामात व्यस्त असतानाच मंगला यांच्यावर वाघाने मागील बाजूने हल्ला केला.

Web Title: The wife in the jaws of the tiger and the husband with the ax ran away from the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.