वाघाच्या हल्ल्यातील जखमी महिलेचा अखेर मृत्यू, रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

By गेापाल लाजुरकर | Published: December 27, 2022 05:35 PM2022-12-27T17:35:53+5:302022-12-27T17:38:35+5:30

सुरुवातीला त्यांनी कळंबाचे झाड तोडले. यानंतर मोहाच्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी प्रभाकर हे झाडावर चढले, तर मंगलाबाई या झाडाखाली बारीक फांद्या तोडून जमा करीत होती.

The woman injured in the tiger attack finally died, breathed her last in the hospital | वाघाच्या हल्ल्यातील जखमी महिलेचा अखेर मृत्यू, रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

वाघाच्या हल्ल्यातील जखमी महिलेचा अखेर मृत्यू, रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Next

गडचिरोली: वाघाच्या जबड्यातून सुटून गंभीर जखमी झालेल्या आंबेटोला येथील मंगला प्रभाकर कोहपरे (५०) ह्या महिलेचा गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात मंगळवारी मध्यरात्री १२:३० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. आंबेटोला येथील मंगला प्रभाकर कोहपरे या सोमवारी सरपणासाठी शेतातील झाडाच्या फांद्या आणण्यासाठी गेल्या होत्या. 

सुरुवातीला त्यांनी कळंबाचे झाड तोडले. यानंतर मोहाच्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी प्रभाकर हे झाडावर चढले, तर मंगलाबाई या झाडाखाली बारीक फांद्या तोडून जमा करीत होती. याचवेळी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास वाघाने मंगलाबाईवर हल्ला केला. प्रभाकर यांनी  वाघाचा पाठलाग करताना एक कुऱ्हाड वाघाच्या दिशेने भिरकावली तर दुसरी कुऱ्हाड घेऊन ते वाघाच्या मागे धावले. यानंतर तणसाच्या ढिगावर चढून आरडाओरड केली तेव्हा वाघ पळून गेला.

गावकऱ्यांच्या मदतीने मंगलाबाईला जिल्हा रुग्णालयात गंभीरस्थितीत भरती केले; परंतु उपचाराला प्रतिसाद न दिल्याने अखेर मंगळवारी मध्यरात्री  १२:३० वाजताच्या सुमारास मंगला यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगला यांच्या पश्चात पती,  विवाहित दोन मुले, एक मुलगी तसेच सासू असा परिवार आहे.
 

Web Title: The woman injured in the tiger attack finally died, breathed her last in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.