गडचिराेली शहरातील युवक गांजाच्या आहारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 05:00 AM2022-02-14T05:00:00+5:302022-02-14T05:00:26+5:30

अनेक युवक चाेरून-लपून सिगारेट ओढतात, मात्र ही बाब अनेक पालकांना माहीत नाही. सायंकाळच्या सुमारास इंदिरा गांधी चाैकातील पानठेल्यांच्या मागे युवक सिगारेटचे धूर साेडत असल्याचे दिसून येतात. काही जणांना तर  चहासाेबत सिगारेट ओढण्याची सवय झाली आहे. एका हातात चहाचा कप तर दुसऱ्या हातात सिगारेट दिसून येते.

The youth of Gadchiraeli are on a cannabis diet | गडचिराेली शहरातील युवक गांजाच्या आहारी

गडचिराेली शहरातील युवक गांजाच्या आहारी

googlenewsNext

दिगांबर जवादे 
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : शहरातील अनेक ठिकाणी गांजाची विक्री केली जात असून, शहरातील शेकडाे तरुण गांजाच्या आहारी गेले आहेत. गांजा ओढण्याचे काही प्रमुख ठिकाणेसुध्दा बनली आहेत. गडचिराेली शहरातील काही युवकांना गांजा ओढण्याची सवय जडली आहे. वर्दळीच्या ठिकाणी गांजा ओढणे शक्य नसल्याने काही युवक पाेटेगाव मार्ग, सेमाना देवस्थान परिसर व इतर माेकळ्या जागी  रात्रीच्या सुमारास जाऊन गांजा घेत असल्याचे दिसून येते. गांजा ओढणाऱ्या युवकांच्या टाेळ्या तयार झाल्या आहेत. रात्रीच्या सुमारास या टाेळ्यांची मैफल रंगत असल्याचे दिसून येते. 

१०० रुपयाला दाेन ग्रॅम
गांजाची खरेदी-विक्री व वाहतूक तसेच सेवनावर शासनाने प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे गांजाची विक्री करणे गुन्हा आहे. तरीही शहरातील जवळपास १० विक्रेते गांजाची चाेरून-लपून विक्री करतात. १०० रुपयाला केवळ दाेन ग्रॅम गांजा मिळतो.

पाेलिसांनी लक्ष द्यावे
दिवसेंदिवस युवा वर्ग गांजाच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहे. गांजा ओढण्याची काही ठिकाणे निश्चित झाली आहेत. या ठिकाणांवर पाेलिसांनी पाळत ठेवण्याची गरज आहे. पाेलीस कारवाई झाल्यास गांजा ओढणाऱ्यांना आळा बसण्यास मदत हाेईल.

चाेरून-लपून ओढतात सिगारेट
अनेक युवक चाेरून-लपून सिगारेट ओढतात, मात्र ही बाब अनेक पालकांना माहीत नाही. सायंकाळच्या सुमारास इंदिरा गांधी चाैकातील पानठेल्यांच्या मागे युवक सिगारेटचे धूर साेडत असल्याचे दिसून येतात. काही जणांना तर  चहासाेबत सिगारेट ओढण्याची सवय झाली आहे. एका हातात चहाचा कप तर दुसऱ्या हातात सिगारेट दिसून येते.

काही दिवसांपूर्वी गडचिराेली शहरातील पाेटेगाव मार्गावरील एक युवक तसेच काेटगल येथील एका इसमावर कारवाई करून त्यांच्याकडून गांजा जप्त केला आहे. दरदिवशी सायंकाळी एमआयडीसी परिसर, स्टेडीयमवर पाेलिसांमार्फत पेट्राेलिंग केली जाते. शहरातील इतरही गांजा विक्रेत्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. गांजा विक्रेत्यांवर लवकरच कारवाई केली जाईल. तसेच गांजा पिण्याच्या अड्ड्यांवरही धाड घातली जाईल.
- अरविंदकुमार कतलाम, ठाणेदार, पाेलीस स्टेशन गडचिराेली

 

Web Title: The youth of Gadchiraeli are on a cannabis diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.