जिल्ह्यात आता केवळ ६४२ क्रियाशिल रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 05:00 AM2020-11-13T05:00:00+5:302020-11-13T05:00:19+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात नवीन कोरोनाबाधितांची संख्या घटत असून कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात नवीन कोरोनाबाधितांची संख्या घटत असून कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. गुरूवारी (दि.१२) कोरोनाच्या ३८ नवीन रुग्णांची भर पडली तर ९३ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे क्रियाशिल रुग्णांची संख्या घटून ती आता ६४२ वर आली आहे.
आतापर्यंत एकूण बाधित ६७३३ पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६०२४ वर पोहोचली आहे. एकूण ६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.४७ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ९.५४ टक्के तर मृत्यूदर १ टक्के झाला आहे.
मागील दाेन दिवसांपासून काेराेनाच्या रूग्णांमध्ये घट हाेत चालली आहे. त्यामुळे काेराेनाची लाट ओसरत असावी, असा अंदाज आराेग्य विभागामार्फत व्यक्त केला जात आहे. त्यातच आता दिवाळी असल्याने विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१९९ रुग्ण गृह विलगिकरणात
जिल्ह्यात सध्या क्रियाशिल असणाऱ्या ६४२ कोरोनाबाधितांपैकी १९९ जण स्वत:च्या घरीच गृह विलगीकरणात आहेत तर ४४३ जण ठिकठिकाणच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. दिवाळीत आपल्या घरी जाण्याची इच्छा अनेक क्रियाशिल रुग्णांची असली तरी ज्यांना रुग्णालयात किमान ७ दिवस पूर्ण झाले त्यांनाच सुटी दिली जात आहे. दरम्यान क्रियाशिल रुग्णांचे प्रमाण घटल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताणही कमी झाल्याचे दिसून येते.
असे आहेत नवीन बाधित रुग्ण
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील रामनगर ४, स्नेहनगर ३, हनुमान वार्ड १, हिरापूर १, अडपल्ली १, रेड्डी गोडाऊन १, आशीर्वाद नगर १, सोनापूर कॉम्प्लेक्स १, रामपुरी वार्ड कॅम्प एरिया १, पोर्ला १, फुले वार्ड १, कन्नमवार नगर १, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक २, आलापल्ली १, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक ४, वडधा १, डोंगरगाव १, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये धोडराज २, चामोर्शी तालुक्यातील आष्टी १, स्थानिक १, क्रिष्णनगर १, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये ग्रामीण रुग्णालयातील १, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक २, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये खुदीरामपल्ली १, तसेच वडसा तालुक्यातील शंकरपूरचे २ जण असा समावेश आहे.
नवीन ३८ बाधितांमध्ये सर्वाधिक १७ गडचिरोली तालुक्यातील आहेत. तसेच अहेरी तालुका ३, आरमोरी ६, भामरागड २, चामोर्शी ३, धानोरा १, एटापल्ली २, मुलचेरा २ आणि देसाईगंज येथील २ जणांचा समावेश आहे.
कोरोनामुक्त झालेल्या ९३ रूग्णांमध्ये गडचिरोली २८, अहेरी १८, आरमोरी ३, भामरागड ९, चामोर्शी ६, धानोरा ४, एटापल्ली २, मुलचेरा ४, सिरोंचा २ कोरची ४, कुरखेडा ५ आणि देसाईगंजमधील ८ जणांचा समावेश आहे.