विमाशी संघाशिवाय पर्याय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:37 AM2021-07-28T04:37:48+5:302021-07-28T04:37:48+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आमदार व्ही. यू. डायगव्हाणे हाेते. मुख्य मार्गदर्शक म्हणून विमाशीचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, प्रमुख ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आमदार व्ही. यू. डायगव्हाणे हाेते. मुख्य मार्गदर्शक म्हणून विमाशीचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विठ्ठलराव चौथाले, लक्ष्मणराव धोबे, प्रा. पुनित मातकर, सिनेट सदस्य अजय लोंढे, जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, सत्कार मूर्ती तथा जिल्हा कार्याध्यक्ष कैलास भोयर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी. एम. बुरांडे, प्रा. डॉ. पंकज नरुले, प्राचार्य शेमदेव चाफले, प्राचार्य ज्ञानेश्वर शिवनकर, सिनेट सदस्य सुनील शेरकी, चामोर्शी विमाशी अध्यक्ष संजय कुनघाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कवी संजय कुनघाडकर लिखित ‘जय गीत’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. संचालन गजानन बारसागडे तर प्रास्ताविक संजय कुनघाडकर आणि आभार राकेश खेवले यांनी मानले. यावेळी विमाशीचे जिल्हा कार्याध्यक्ष कैलाश भोयर व त्यांच्या पत्नी शीला भोयर, नवनिर्वाचित मुख्याध्यापक नरेंद्र भोयर व रोशन थोरात यांचा सत्कार करण्यात आला.
270721\img-20210726-wa0009.jpg
जयगीत काव्यसंग्रहांचे लोकार्पण करतांना मान्यवर