आर्थिक नियाेजनाशिवाय कुटुंबाची प्रगती नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:44 AM2021-07-07T04:44:59+5:302021-07-07T04:44:59+5:30
गडचिराेली : पैशाने सर्वच समस्या मार्गी लागत नसल्या तरी संकटाच्या काळात पैसा हा माेठा आधार आहे. प्रत्येक कुटुंबातील पुरुष ...
गडचिराेली : पैशाने सर्वच समस्या मार्गी लागत नसल्या तरी संकटाच्या काळात पैसा हा माेठा आधार आहे. प्रत्येक कुटुंबातील पुरुष व महिलांनी आपल्या मिळकतीतून बचत केली पाहिजे. आर्थिक नियाेजनाशिवाय कुटुंबाची प्रगती शक्य नाही, असे प्रतिपादन नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र चाैधरी यांनी केले.
आर्थिक साक्षरता निधी अंतर्गत राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा नवेगावच्यावतीने साेमवारी शाखेच्या कार्यालयात एकदिवसीय आर्थिक व डिजिटल साक्षरता कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बाेलत हाेते.
याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयातील व्यवस्थापक राजू साेरते तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी विभागाच्या सांख्यिकी अधीक्षक शीतल खाेब्रागडे, जिल्हा उद्याेग केंद्राच्या वनश्री रामटेके आदी मान्यवर उपस्थित हाेते. याप्रसंगी व्यवस्थापक राजेंद्र चाैधरी यांनी बँक व्यवहार व शासनाच्या विमा याेजनेबाबत माहिती देऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. बॅंकेचे व्यवस्थापक राजू साेरतेे यांनी विविध प्रकारची उदाहरणे देऊन दैनंदिन जीवन घालविताना केलेली मिळकत व दरराेजचा खर्च याचा ताळमेळ बसवावा, असे सांगितले. याप्रसंगी अधीक्षक शीतल खाेब्रागडे व वनश्री रामटेके यांनी शासकीय याेजनांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
संचालन व प्रास्ताविक नवेगाव बँक शाखेच्या व्यवस्थापक वैशाली बाेरडे यांनी केले तर आभार राेखपाल सुशील बगमारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी बँक शाखेचे कर्मचारी अमाेल खेवले, सुमनदास लेनगुरे व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला नवेगाव व काॅम्प्लेक्स परिसरातील बँकेचे खातेदार व बचतगटाच्या महिला उपस्थित हाेत्या.
बाॅक्स...
निराधार बहीण-भावाला आर्थिक मदत
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा नवेगावच्यावतीने मुडझा येथील रहिवासी प्रतीक्षा शेंडे व भाऊ ज्ञानेश्वर शेंडे या निराधार बहीण-भावाला आर्थिक मदत देण्यात आली, तसेच काही नवीन खातेदारांना एटीएमचे वाटप करण्यात आले. कर्ज मंजूर झालेल्या खातेदारांना कर्जाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिवाय यावेळी पंतप्रधान जीवन ज्याेती विमा याेजनेचे भरलेले फार्म जमा करण्यात आले.