जिल्ह्यात चाराटंचाई नाही

By admin | Published: May 16, 2016 01:24 AM2016-05-16T01:24:03+5:302016-05-16T01:24:03+5:30

गतवर्षीच्या खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाल्याने मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवत आहे.

There is no feeding in the district | जिल्ह्यात चाराटंचाई नाही

जिल्ह्यात चाराटंचाई नाही

Next

पशुसंवर्धन विभागाचा अहवाल : २ लाख ७७ हजार मेट्रिक टन अतिरिक्त वैरण उपलब्ध
दिलीप दहेलकर गडचिरोली
गतवर्षीच्या खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाल्याने मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवत आहे. दुष्काळामुळे पाळीव जनावरांसाठी चारा टंचाई आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सर्वेक्षणाअंती एप्रिलअखेर तयार केलेल्या अहवालानुसार गडचिरोली जिल्ह्यात दुष्काळाच्या परिस्थितीतही मुळीच चारा टंचाई नाही. उलट जिल्ह्यात २ लाख ७७ हजार १५४ मेट्रिक टन अतिरिक्त वैरण उपलब्ध आहे.

सन २०१२ च्या १९ व्या पशु गणणेनुसार गडचिरोली जिल्ह्यात गाय व म्हैस वर्गातील मिळून एकूण ४ लाख ६६ हजार ९४३ मोठे पशुधन आहे. गाय व म्हैस वर्ग मिळून एकूण १ लाख १७ हजार १०१ लहान पशुधन तर शेळ्या व मेंढ्या मिळून २ लाख १० हजार ११५ पशुधन आहेत. तिन्ही प्रकारातील मिळून जिल्ह्यात एकूण ७ लाख ९४ हजर १५९ पशुधन आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात वनक्षेत्रापासून १३ लाख २ हजार मेट्रिक टन, कृषी पिकाच्या दुय्यम उत्पादनापासून १ लाख ९ हजार व कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनेंतर्गत वैरण बियाणे व ठोंबे वितरणामुळे लागवडीखाली येणाऱ्या क्षेत्रांपासून ६३ हजार मेट्रिक टन अशा प्रकारे एकूण १४ लाख ७४ हजार मेट्रिक टन वैरण सर्व मार्गानी उपलब्ध होत आहे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या गतिमान वैरण विकास योजनेतून २१० क्विंटल बियाणे वितरित करण्यात आले आहे. यातूनही चारा उपलब्ध होत आहे. जिल्ह्यात आवश्यकतेपेक्षा २ लाख ७७ हजार १५४.१ अतिरिक्त वैरण उपलब्ध असल्याचे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या अहवालात नमूद आहे. जिल्ह्यात मूळीच चारा टंचाई नसल्यामुळे पशुधनाला धोका पोहोचणार नाही, असेही यावरून दिसून येते.

दिवसाला ३ हजार २७९ मेट्रिक टन चारा आवश्यक
मोठ्या पशुधनाला प्रती दिवस प्रती पशुधन सहा किलो, लहान पशुधनाला प्रती दिवस तीन किलो व शेळ्या, मेंढ्या प्रती पशुधनाला प्रती दिवस एकूण ३ हजार २७९ मेट्रिक टन वैरणाची आवश्यकता आहे. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या लहान-मोठ्या पशुधनाच्या क्षमतेनुसार वर्षाला एकूण ११ लाख ९६ हजार ८४६ मेट्रिक टन वैरणाची आवश्यकता आहे.

Web Title: There is no feeding in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.