सव्वा दोन कोटींचा निधी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 12:58 AM2017-10-07T00:58:57+5:302017-10-07T00:59:10+5:30

स्थानिक गोंडवाना विद्यापीठाकडे जाणाºया कोटगल मार्गावर आरक्षित करण्यात आलेल्या १.७३ हेक्टर आर जागेमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीचे ८० टक्के काम झाले आहे.

 There is no funding available for two crores | सव्वा दोन कोटींचा निधी मिळेना

सव्वा दोन कोटींचा निधी मिळेना

Next
ठळक मुद्देशासनाचा कानाडोळा : आरटीओ कार्यालय इमारतीचे काम थांबले

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाकडे जाणाºया कोटगल मार्गावर आरक्षित करण्यात आलेल्या १.७३ हेक्टर आर जागेमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीचे ८० टक्के काम झाले आहे. गेल्या साडेचार महिन्यांपासून निधीच नसल्याने पुढील उर्वरित २० टक्के काम थांबले आहे. आरटीओ इमारत कामास निधीचे ग्रहण लागले आहे. राज्याचे परिवहन मंत्री याकडे लक्ष देतील काय, असा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे.
आरटीओ कार्यालयाच्या प्रशासकीय कामात गती आणण्याच्या उद्देशाने शासनाने फेबु्रवारी २०१४ मध्ये आरटीओ कार्यालयाच्या नव्या इमारत बांधकामास मंजुरी प्रदान केली. अंदाजपत्रकानुसार या इमारतीच्या कामाची किंमत ६ कोटी १९ लाख ५८ हजार रूपये असून एवढ्या खर्चास प्रशासकीय मान्यताही शासनाने दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली खासगी कंत्राटदारामार्फत सदर इमारतीचे काम आरक्षित जागेत सुरू करण्यात आले. एप्रिल २०१७ पर्यंत सदर आरक्षित जागेत आरटीओ कार्यालयाची मुख्य इमारत, सायकल/दुचाकी तळ, सुलभ शौचालय, संरक्षण भिंत तसेच प्रवेशद्वार आदी कामे पूर्ण झाली आहेत. सदर इमारतीच्या कामासाठी सन २०१४-१५ वर्षात ८५.८१ लाख, २०१५-१६ मध्ये ८६.९६ लाख तसेच २०१६-१७ मध्ये २४७.१२ लाख असा एकूण ४ कोटी १९ लाख ८९ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला. हा सर्व निधी इमारतीच्या ८० टक्के कामावर खर्च करण्यात झाला. गेल्या साडेचार ते पाच महिन्यांपासून इमारतीचे विद्युतीकरण, फर्निचर, फायटनिंग, नागरिकांसाठी सुविधा, साईनेजेस, सौरऊर्जा प्रणाली आदी कामे शिल्लक आहेत. आरटीओ कार्यालयाच्या इमारतीसाठी लागणारा २ कोटी ३० लाखांचा निधी देण्यास शासनाची उदासीनता दिसून येत आहे.

Web Title:  There is no funding available for two crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.