पाणी शुद्धिकरण यंत्र आहे, पण वीज कनेक्शनच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:43 AM2021-09-04T04:43:32+5:302021-09-04T04:43:32+5:30
कोरेगाव ग्रामपंचायतअंतर्गत परसवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये तीन वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्याची व्यवस्था करून देण्याच्या माध्यमातून शाळेमध्ये हजार रुपयांचे ...
कोरेगाव ग्रामपंचायतअंतर्गत परसवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये तीन वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्याची व्यवस्था करून देण्याच्या माध्यमातून शाळेमध्ये हजार रुपयांचे आरोचे पाणी शुद्धिकरण यंत्र बसवण्यात आले; परंतु आरोचे आणि हातपंपाचे पाण्याचे कनेक्शन जोडून न दिल्यामुळे, तसेच विद्युत कनेक्शन जोडणी न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुद्ध पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत शुद्ध पाणी गरजेचे आहे. या सदराखाली ग्रामपंचायतने पाणी शुद्धिकरण यंत्रावर हजारो रुपये खर्च केले. शाळेमध्ये यंत्र बसवले, पण परंतु सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतकडून हवी तशी उपाययोजना न झाल्यामुळे हे यंत्र हा कुचकामी झाले आहे. या यंत्राचा फायदा केवळ ग्रामपंचायतीच्या पद्धतीत पदाधिकाऱ्यांनी व सचिवाने घेतला असल्याचे स्थानिक पालक, नागरिकांचे म्हणणे आहे. येथील हातपंप देखील अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असताना ग्रामपंचायतकडून अजूनपर्यंत दुरुस्ती झालेली नाही. शालेय व्यवस्थापन समितीकडून अनेकदा हातपंप दुरुस्ती व पाणी शुद्धिकरण यंत्र सुरू करून देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, कोरेगाव ग्रामपंचायतकडून या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
ग्रामपंचायत नाही शाळेला संरक्षण भिंत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. हातपंपाची दुरुस्ती करून पाणी शुद्धिकरण यंत्र सुरू करून देण्याची मागणी येथील शालेय व्यवस्थापन समिती व नागरिकांनी केली आहे.
बाॅक्स :
लोकवर्गणीतून केली रंगरंगाेटी
दोन वर्षांंपूर्वी येथील ग्रामस्थांनी आमच्या शाळेकडे कोणाचे लक्ष नाही, कोणी निधी देत नाही म्हणून गावातून पालक व नागरिकांकडून प्रत्येकी शंभर रुपये लोकवर्गणी काढून शाळेची रंगरंगोटी स्वतः नागरिकांनी कोणतीच मजुरी न घेता आळीपाळीने येऊन केलेली आहे, तसेच शाळेला संरक्षण भिंत नसल्यामुळे नागरिकांनी आपापल्या घरून बांबू आणून शाळेला कुंपण केले, तसेच तार लावून दिली. या कामाचा नागरिकांनी कोणताच मोबदला घेतला नाही. या शाळेला वाॅल कंपाऊंड नसल्यामुळे जनावरे शाळेमध्ये घुसून फुलझाडांची नासाडी करत आहेत.