‘ उणिवा आहेच, त्या दूर कराव्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:04 AM2019-04-05T00:04:11+5:302019-04-05T00:05:41+5:30

वाढत्या उन्हामुळे तापत असलेल्या वातावरणात निवडणुकीचेही वातावरण आता गरम होत आहे. दैनंदिन कामकाजात व्यस्त असणाऱ्या मतदारांचा एसटी बसच्या प्रवासात कानोसा घेण्याचा प्रयत्न लोकमतने केला.

'There is a weakness, to remove it' | ‘ उणिवा आहेच, त्या दूर कराव्या’

‘ उणिवा आहेच, त्या दूर कराव्या’

Next
ठळक मुद्देबसमध्ये रंगली राजकीय चर्चा । एसटीच्या लाल डब्यात बसून ‘लोकमत’ प्रतिनिधीने जाणून घेतले जनतेचे ‘मत’

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वाढत्या उन्हामुळे तापत असलेल्या वातावरणात निवडणुकीचेही वातावरण आता गरम होत आहे. दैनंदिन कामकाजात व्यस्त असणाऱ्या मतदारांचा एसटी बसच्या प्रवासात कानोसा घेण्याचा प्रयत्न लोकमतने केला. प्रथमच मतदान करणाऱ्या तरुण मतदारांपासून वृद्ध महिलांपर्यंत सर्वांनी आपल्या भावना मांडताना वेगवेगळे मतप्रदर्शन केले. मोदींचे आकर्षण मात्र बहुतांश लोकांना असल्याचे दिसून आले. अनेक चांगली कामे त्यांनी केली असली तरी काही उणिवाही आहेत. त्या दूर कराव्या अशी अपेक्षा मतदारांनी व्यक्त केली.

कुणीही आले तरी शेतकऱ्यांचे मरणच
गडचिरोली ते चामोर्शी
३६ किमी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली ते अहेरी जाणाºया बसमधील चामोर्शीपर्यंतच्या प्रवासात अहेरी विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या भावना जाणून घेता आल्या. त्यात काहींनी एकूणच राजकीय व्यवस्थेबद्दल अनास्था आणि काहीसा रोष व्यक्त केला. तर काहींनी प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. गणेश मांढरे या शेतकºयाने आपल्या भावना व्यक्त करताना, कोणतेही सरकार आले तरी शेतकºयांचे मरण टळत नाही. त्याच्या प्रगतीसाठी कोणीच काही करत नाही, असे सांगितले. मात्र अहेरीच्या एस.एम.कोडाप यांनी आधुनिक सुविधांमध्ये वाढ होताना प्रगती दृष्टीपथास येत असल्याचे सांगितले.
आलापल्लीच्या प्रकाश गुडधीवार यांनीही अनेक योजनांचा संदर्भ देत विकासाची कामे सुरू असल्याचे सांगितले.
 

Web Title: 'There is a weakness, to remove it'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.