२५ हजार समाजबांधव येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:27 AM2017-12-16T00:27:40+5:302017-12-16T00:29:41+5:30

कुणबी समाज संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने १७ डिसेंबर रोजी रविवारला स्थानिक धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या कुणबी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

There will be 25 thousand Sociabandh | २५ हजार समाजबांधव येणार

२५ हजार समाजबांधव येणार

Next
ठळक मुद्देरविवारी गडचिरोलीत आयोजन : महामेळाव्याच्या माध्यमातून कुणबी समाज एकवटणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कुणबी समाज संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने १७ डिसेंबर रोजी रविवारला स्थानिक धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या कुणबी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला समाजातील लोकप्रतिनिधींसह वक्तेही उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. संघटनेच्या वतीने सदर महामेळावा यशस्वी करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. या मेळाव्याला गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातून तसेच शेजारील चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली, मूल, ब्रह्मपुरी, नागभिड आदी चार तालुक्यातून जवळपास २५ ते ३० हजार समाजबांधव हजेरी लावणार आहेत. यासाठी संघटनेच्या वतीने पुरेशी आसन व्यवस्था व इतर सोयीसुविधा मेळावास्थळी करण्यात येणार आहे.
या महामेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून खा. नाना पटोले, आ. बच्चु कडू, आ. सुनील केदार, आ. बाळू धानोरकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय समाजबांधवांचे वैचारिक प्रबोधन करण्यासाठी साहित्यिक तथा कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर, प्रा. दिलीप चौैधरी, मेघा रामगुंडे व वैष्णवी डाफ गडचिरोेलीत या कार्यक्रमाच्या निमित्ताने हजेरी लावणार आहेत.
या मेळाव्यात नॉनक्रिमिलेअरच्या अटीतून सर्व ओबीसी प्रवर्गाला सूट देण्यात यावी, ओबीसींची स्वतंत्र जनगणना करून जातनिहाय आकडेवारी घोषित करावी, ओबीसींसाठी मंजूर केलेल्या स्वतंत्र मंत्रालयाला लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक तरतूद करून हे मंत्रालय तत्काळ कार्यान्वित करावे. शेतकरी हिताच्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, मंडल आयोगाच्या मूळ शिफारशी लागू कराव्या, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे कमी केलेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे आदी मागण्यांवर विचारमंथन करण्यात येणार आहे.
कुणबी समाजबांधवांवर शासनाकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात पुकारण्यात येणाºया पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे. मेळाव्याच्या अनुषंगाने गेल्या दीड महिन्यापासून गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुकास्थळी तसेच अनेक मोठ्या गावांमध्ये जनजागृतीपर समाजाच्या सभा घेतल्या जात आहेत.
अशी राहील वाहनांसाठी पार्र्किं ग व्यवस्था
गडचिरोेली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या कुणबी समाजाच्या महामेळाव्याला जवळपास २५ ते ३० हजार समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. या सर्वांच्या वाहन पार्र्किंगची व्यवस्था कुणबी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. आरमोरी, वडसा, कुरखेडा व आरमोरी तालुक्यातून येणाºया समाजबांधवांच्या वाहनांसाठी वडेट्टीवार पेट्रोलपंपच्या बाजूला आखाडे लॉन येथे पार्र्किं गची व्यवस्था करण्यात आली आहे. चामोर्शी तालुक्यासह अहेरी उपविभागातून तसेच चंद्रपूर जिल्ह्यातून मूल मार्गे येणाºया समाजबांधवांच्या वाहनासाठी चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॉन येथे तर धानोरा तालुक्यातून येणाºया वाहनांसाठी पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या तलावाच्या जागेत वाहन पार्र्किं गची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रशस्त शामियाना व आसन व्यवस्था
महामेळाव्यासाठी मैदानावर प्रशस्त शामियाना संघटनेच्या वतीने उभारण्यात येत आहे. याशिवाय मान्यवरांसाठी मंचाची सजावटही करण्यात येणार आहे. मंचाच्या पुढे बैठी आसन व्यवस्था राहणार असून त्यानंतर खुर्च्यांची व्यवस्था राहणार आहे. सदर मेळाव्यासाठी तीन हजार खुर्च्या येथे लावण्यात येणार आहे.
शेवटच्या समाजबांधवाला मंचावरील मान्यवरांना थेट पाहता यावे, तसेच ऐकता यावे, यासाठी सदर कार्यक्रमस्थळी दर्शनी भागावर दोन एलईडी टीव्हीची व्यवस्था करण्यात येणार आहे.
मेळावास्थळी तसेच धानोरा व मूल मार्गावर स्टॉल लावून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था संघटनेतर्फे करण्यात येणार आहे.
बैलबंडी रॅली निघणार
सदर महामेळाव्याला येणारे समाजातील लोकप्रतिनिधी व वक्ते वाहनाद्वारे इंदिरा गांधी चौकात पोहोचणार आहेत. येथून बैलबंडीवर बसून मान्यवर कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहेत. यावेळी बैलबंडी रॅली निघणार आहे.

Web Title: There will be 25 thousand Sociabandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.