विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवासासाठी जिल्ह्यात 50 चालक हाेणार रूजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2022 05:00 AM2022-02-13T05:00:00+5:302022-02-13T05:00:39+5:30

गडचिराेली जिल्ह्यातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्यासाठी शासनाने मानव विकास मिशनच्या बसेस सुरू केल्या आहेत. बससेवा उपलब्ध असल्याने अनेक विद्यार्थिनींनी दूरवरच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. मात्र एसटी सेवा बंद असल्याने शाळेत येण्याची समस्या निर्माण झाली आहे. बस उपलब्ध नसल्याने काही विद्यार्थिनींनी शाळेत जाणे बंद केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनावर ताेडगा म्हणून एसटी व्यवस्थापन खासगी एजन्सीमार्फत एसटी चालकांची नियुक्ती करीत आहे.

There will be 50 drivers in the district for school trips of students | विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवासासाठी जिल्ह्यात 50 चालक हाेणार रूजू

विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवासासाठी जिल्ह्यात 50 चालक हाेणार रूजू

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : येत्या आठ दिवसात गडचिराेली विभागाला ५० चालक उपलब्ध हाेणार आहेत. यातील बहुतांश चालकांच्या मदतीने मानव विकास मिशनच्या बसफेऱ्या सुरू केल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासाची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर हाेणार असली तरी सामान्य प्रवाशांचे हाल मात्र अजुनही कायम आहेत. 
गडचिराेली जिल्ह्यातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्यासाठी शासनाने मानव विकास मिशनच्या बसेस सुरू केल्या आहेत. बससेवा उपलब्ध असल्याने अनेक विद्यार्थिनींनी दूरवरच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. मात्र एसटी सेवा बंद असल्याने शाळेत येण्याची समस्या निर्माण झाली आहे. बस उपलब्ध नसल्याने काही विद्यार्थिनींनी शाळेत जाणे बंद केले आहे. 
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनावर ताेडगा म्हणून एसटी व्यवस्थापन खासगी एजन्सीमार्फत एसटी चालकांची नियुक्ती करीत आहे. गडचिराेली विभागाला ५० चालक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यातील काही चालक साेमवारी रुजू हाेणार आहेत. 

जिल्हाधिकारी आग्रही
-    बसअभावी विद्यार्थ्यांची शाळा बुडत असल्याने मानव विकास मिशनच्या बसेस सुरू करण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी संजय मिना यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार एसटी प्रशासन सर्वप्रथम मानव विकास मिशनच्या बस सुरू करणार आहे. 

वाहकांचे काय? 
चालक रुजू हाेणार असले तरी वाहकांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे काही एसटीच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांवर वाहकाची जबाबदारी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
मानव विकास मिशनच्या बसेसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींकडे पास राहते. त्यामुळे त्यांच्याकडून तिकिटाचे पैसे वसूल करण्याची गरज पडत नाही. परिणामी वाहकाशिवाय बसेस चालविता येणार आहेत. 

सामान्य नागरिकांचे हाल सुरूच 
एसटीचा संप लांबतच चालला आहे. जुने कर्मचारी कामावर रुजू हाेण्यास तयार नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल सुरू आहेत. शासनाने चालकांप्रमाणेच वाहकांचीही नियुक्ती करावी. जाहिरात काढल्यास लाखाे बेराेजगार एसटीत नाेकरी करतील. चालक भरतीबराेबरच आता वाहकांची भरती सुध्दा करावी लागणार आहे.

२२ फेब्रुवारीच्या सुनावणीकडे लक्ष 
एसटीचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर आहेत. १८ फेब्रुवारीला अहवाल सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहे. त्यानंतर २२ फेब्रुवारीला यावर सुनावणी हाेणार आहे. अहवालात काय म्हटले आहे, सुनावणीदरम्यान निकाल लागणार काय, याकडे एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

५० चालक देण्याचे पत्र प्राप्त
गडचिराेली विभागाला ५० कंत्राटी चालक उपलब्ध करून देण्याचे पत्र प्राप्त झाले आहे. साेमवारपासून काही चालक रूजू हाेतील. या चालकांच्या मदतने सर्वप्रथम मानव विकास मिशनच्या बसेस सुरू केल्या जातील.
- अशाेककुमार वाडीभस्मे, विभागीय नियंत्रक, गडचिराेली

 

Web Title: There will be 50 drivers in the district for school trips of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.