मतमाेजणीसाठी ६० कर्मचारी व ३६ निवडणूक अधिकारी राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:33 AM2021-01-22T04:33:18+5:302021-01-22T04:33:18+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चामाेर्शी : तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमाेजणी मूल मार्गावरील केवळराम हरडे महाविद्यालयाच्या सभागृहात २२ जानेवारी राेजी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चामाेर्शी : तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमाेजणी मूल मार्गावरील केवळराम हरडे महाविद्यालयाच्या सभागृहात २२ जानेवारी राेजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू हाेणार आहे. त्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. १४ टेबलवर मतमाेजणी हाेणार आहे. त्यासाठी ६० कर्मचारी व ३६ निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
मतमाेजणीसाठी असलेल्या प्रत्येक टेबलवर दाेन तलाठी व त्यांना मदतनीस म्हणून इतर कर्मचारी असे एकूण ६० कर्मचारी राहणार आहेत. तालुक्यातील एकूण ७५ ग्रामपंचायतींपैकी ६९ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली हाेती. चार ग्रामपंचायतींमध्ये अविराेध निवड झाली. त्यामुळे ६५ ग्रामपंचायतींच्या १९८ प्रभागांमध्ये २० जानेवारी राेजी मतदान घेण्यात आले. ४६२ जागांसाठी १ हजार ५१ उमेदवार रिंगणात हाेते. सर्वच ठिकाणच्या निवडणुका अत्यंत चुरसीच्या झाल्या. सर्वप्रथम टपालांची माेजणी केली जाणार आहे. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची माेजणी हाेईल. शेवटी राहणाऱ्या ग्रामपंचायतीचा निकाल घाेषित हाेण्यास सायंकाळ हाेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आकाश अवतारे यांच्या मार्गदर्शनात मतमाेजणीची तयारी पूर्ण झाली आहे. तहसीलदार गजेंद्र बालपांडे, नायब तहसीलदार दिलीप दुधबळे, मदन शेंडे, एन. बी. लाेखंडे हे मतमाेजणीचे प्रत्यक्ष नियाेजन करीत आहेत. प्रभारी पाेलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या नेतृत्वात चाेख पाेलीस बंदाेबस्त ठेवला जाणार आहे.