हे रस्ते माणसांसाठी की जनावरांसाठी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:42 AM2021-09-23T04:42:19+5:302021-09-23T04:42:19+5:30

कॉम्प्लेक्सकडे जाणारा मुख्य मार्ग असो की चामोर्शी, आरमोरी मार्ग असो, त्यावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. पण या मुख्य ...

These roads are for people or animals! | हे रस्ते माणसांसाठी की जनावरांसाठी !

हे रस्ते माणसांसाठी की जनावरांसाठी !

Next

कॉम्प्लेक्सकडे जाणारा मुख्य मार्ग असो की चामोर्शी, आरमोरी मार्ग असो, त्यावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. पण या मुख्य मार्गांवर दररोज मोकाट जनावरांचे कळप निवांतपणे बसलेले असतात. त्यांना कोणीच डिस्टर्ब करणार नाही, याची खात्री असल्यामुळे या जनावरांचे मालकही बिनधास्त असतात. पण यामुळे अवजड वाहनांची अडचण होत आहे. यातून एखादा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन नगर परिषद प्रशासनाला निर्देश देण्याची गरज आहे.

(बॉक्स)

नगर परिषदेची थातूरमातूर कारवाई

गडचिरोली नगर परिषदेने काही दिवसांपूर्वी मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकले. त्यानंतर जागा नसल्याचे सांगत ८ दिवसात त्या जनावरांचा लिलाव केला. पण त्यानंतर या कारवाईत सातत्य ठेवले नाही. त्यामुळे मोकाट जनावरांच्या भरकटण्यावर कोणताही परिणाम झाला नाही.

(बॉक्स)

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला खो

दोन महिन्यांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी रस्त्यांवरील मोकाट जनावरांना कोंडवाड्यात टाकून त्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश नगर परिषद, नगर पंचायत प्रशासनाला दिले होते. त्यानुसार गडचिरोलीत चार दिवस कारवाई झाली, पण आता पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाली आहे.

(बॉक्स)

या मार्गावर वाहने जपून चालवा

- काॅम्प्लेक्स मार्ग

- आरमोरी मार्ग

- धानोरा मार्ग

- गुजरी ते सर्वोदय वॉर्ड

- गोकुलनगर बायपास

Web Title: These roads are for people or animals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.