ना हातात बसतात, ना खिशात मावतात; असे माेबाइल चाेरट्यांना साेयीचे ठरतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:42 AM2021-08-14T04:42:01+5:302021-08-14T04:42:01+5:30

गडचिराेली : पूर्वीच्या तुलनेत आता माेठ्या आकाराचे माेबाइल खरेदी केले जातात. मात्र, हे माेबाइल खिशात मावत नाहीत. माेबाइलचा अर्धा ...

They do not fit in the hand, nor do they fit in the pocket; This is a good idea | ना हातात बसतात, ना खिशात मावतात; असे माेबाइल चाेरट्यांना साेयीचे ठरतात

ना हातात बसतात, ना खिशात मावतात; असे माेबाइल चाेरट्यांना साेयीचे ठरतात

Next

गडचिराेली : पूर्वीच्या तुलनेत आता माेठ्या आकाराचे माेबाइल खरेदी केले जातात. मात्र, हे माेबाइल खिशात मावत नाहीत. माेबाइलचा अर्धा भाग बाहेर निघून राहतो. असे माेबाइल चाेरणे चाेरट्यांना सहज शक्य हाेते. त्यामुळे माेबाइल चाेरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून येते.

पूर्वी कि-पॅड माेबाइल हाेते. हे माेबाइल आकाराने अतिशय लहान राहत असल्याने पॅन्टच्या खिशामध्ये सहज ठेवता येत हाेते. या माेबाइलचा काेणताही भाग बाहेर दिसत नसल्याने खिशामध्ये हात टाकून माेबाइल चाेरणे चाेरट्याला अशक्य हाेत हाेते. मात्र, स्मार्टफाेनची स्क्रीन माेठी दिसावी, या उद्देशाने ग्राहक माेठ्यात माेठ्या माेबाइलची मागणी करतात. त्यादृष्टीने कंपन्यांनी आता माेठे माेबाइल बनविण्यास सुरुवात केली आहे. सध्या १६ बाय ७ सेंटिमीटर आकाराच्या माेबाइलला माेठी मागणी असल्याचे दिसून येते. हा माेबाइल आकाराने माेठा असल्याने पॅन्टच्या किंवा शर्टच्या खिशात ठेवला तरी याचा काही भाग बाहेर निघते. काही पॅन्टचे खिसेतर लहान राहतात. अशा पॅन्टमध्ये माेबाइल मावतसुद्धा नाही. माेबाइलचा काही भाग बाहेर निघत असल्याने गर्दीमध्ये चाेरट्याला माेबाइल चाेरणे सहज शक्य हाेते.

बाॅक्स...

या भागामध्ये माेबाइल सांभाळा

- सर्वाधिक माेबाइल चाेरी जाण्याचे प्रमाण आठवडी बाजारांमध्ये घडतात. मात्र, काेराेनामुळे आठवडी बाजार बंद झाले आहेत. मात्र, आता आठवडी बाजाराप्रमाणेच गडचिराेली शहरातील गुजरी, मच्छी मार्केट, मटन मार्केट तसेच शहरातील काही निवडक दुकाने यांच्यामध्ये नागरिकांची माेठी गर्दी राहते. या ठिकाणावरूनच माेबाइल चाेरी जाण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.

- जेवढा महाग माेबाइल तेवढी त्यामध्ये अधिक सुविधा राहत असल्याने १० हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचे माेबाइल नागरिक खरेदी करतात. महागडा माेबाइल चाेरीला गेल्यानंतर पश्चात्ताप करण्याची पाळी येते.

बाॅक्स...

गुन्हा दाखल, पाेलीस हाेतात माेकळे

- माेबाइल चाेरीला गेल्यानंतर संबंधित व्यक्ती जवळच्या पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करते. यावरून पाेलीस अज्ञात आराेपीविराेधात गुन्हा दाखल करतात. मात्र, पाेलिसांवर फाैजदारी गुन्ह्यांच्या कामाचा व्याप अधिक राहत असल्याने माेबाइल चाेरट्याचा शाेध घेण्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही.

- एखादेवेळी चाेरटा आढळून आल्यास त्याला पाेलिसी खाक्या दाखवून आजपर्यंत किती माेबाइल चाेरले व कुणाला विकले हे वदवून घेतात. मात्र, ताेपर्यंत माेबाइलची वयाेमर्यादा संपलेली राहते. त्यामुळे ताे हातात लागूनही काहीच कामाचा राहत नाही.

बाॅक्स...

स्मार्टफाेन म्हणजे मिनी बँकच

आजकाल बहुतांश जण माेबाइलच्या माध्यमातूनच आर्थिक व्यवहार करतात. त्यामुळे त्यांच्या माेबाइलमध्ये बँकेशी संबंधित माहिती राहते. माेबाइल चाेरीला गेल्यानंतर ही माहितीसुद्धा चाेरीला जाते. चाेरट्याकडून या माहितीचा दुरुपयाेग हाेण्याची शक्यता राहते.

Web Title: They do not fit in the hand, nor do they fit in the pocket; This is a good idea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.