चोरट्यांनी इलेक्ट्रॉनिक दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:34 AM2017-11-23T00:34:02+5:302017-11-23T00:34:32+5:30

येथील इंदिरा गांधी चौकातील मुख्य मार्गालगत असलेल्या शांती इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल संच, रोकड रकमेसह १५ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारच्या मध्यरात्री घडली.

The thieves broke an electronic shop | चोरट्यांनी इलेक्ट्रॉनिक दुकान फोडले

चोरट्यांनी इलेक्ट्रॉनिक दुकान फोडले

Next
ठळक मुद्देआरमोरीतील घटना : मोबाईल संच व रोकडसह १.१५ लाखाचा ऐवज लंपास

ऑनलाईन लोकमत 
आरमोेरी : येथील इंदिरा गांधी चौकातील मुख्य मार्गालगत असलेल्या शांती इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल संच, रोकड रकमेसह १५ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारच्या मध्यरात्री घडली.
रवी बारसागडे यांच्या मालकीचे मुख्य मार्गालगत इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून ते दुकानाच्या वर असलेल्या आपल्या घरी झोपी गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील मोबाईल अस्ताव्यस्त फेकून ड्रॉफमध्ये ठेवलेले ९० हजार रूपये, तीन मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक्स सामान मिळून एकूण १ लाख १५ हजार ८०० रूपयांचा ऐवज लंपास केला. बुधवारी सकाळी आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी बारसागडे हे खाली उतरले असता, त्यांना दुकानाचे शटरचे कुलूप तुटल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती आरमोरी पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गडचिरोली येथून स्वान पथक व अंगुलीमुद्र तज्ज्ञांना बोलाविण्यात आले. मात्र चोरट्याचा थांगपत्ता लागला नाही.
अज्ञात चोरट्यांविरोधात आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वरघंटे करीत आहेत. सदर चोरीच्या घटनेमुळे व्यावसायिक व शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरमोरी पोलिसांची रात्र गस्त असतानाही चोरीची घटना घडल्याने आरमोरी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: The thieves broke an electronic shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.