दिना धरणाचे पाणी सोडूनही शेवटची शेती तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 10:39 PM2018-10-01T22:39:12+5:302018-10-01T22:39:29+5:30

पुरेशा प्रमाणात पाऊस न पडल्यामुळे चामोर्शी तालुक्यातील शेतकरी अडचणीत आले आहे. बदलत्या वातावरणामुळे धानपिकावर अनेक रोगांनी आक्रमण केले आहे. पाण्याअभावी धानपीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

Thirsty farming was left without the water of Dina dam water | दिना धरणाचे पाणी सोडूनही शेवटची शेती तहानलेलीच

दिना धरणाचे पाणी सोडूनही शेवटची शेती तहानलेलीच

Next
ठळक मुद्देकालव्यांची दुरवस्था : सिंचनासाठी पाणी पोहोचतच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : पुरेशा प्रमाणात पाऊस न पडल्यामुळे चामोर्शी तालुक्यातील शेतकरी अडचणीत आले आहे. बदलत्या वातावरणामुळे धानपिकावर अनेक रोगांनी आक्रमण केले आहे. पाण्याअभावी धानपीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
चामोर्शी परिसरातील शेतकऱ्यांसाठी जीवदायी ठरलेल्या दिना धरणाचे पाणी शेतीसाठी सोडण्याची मागणी केल्यानंतर या धरणाचे पाणी सोडण्यात आले. नहरामधून पाणी वाहत आहे. परंतु शेवटच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचलेच नाही. दोटकुली, वाघोली, वेलतूर तुकूम, घारगाव, रामाळा या गावातील शेतीपर्यंत पाणी न मिळाल्याने गर्भावर आलेले धानपीक निस्तेज होत आहे. अनेक शेतकºयांचे धानपीक करपून जात आहेत. नहराच्या अर्ध्या भागापर्यंत पाणी वाहत असून समोरचा नहर कोरडाशुष्क पडला आहे. नहराची योग्यप्रकारे देखभाल न झाल्याने शेवटच्या शेतीपर्यंत कन्नमवार जलाशयाचे पाणी पोहोचत नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. अनेक शेतकरी अधिकाºयांच्या नावाने शिमगा साजरा करीत आहेत. शेतकºयांचे धानपीक वाचविण्यासाठी पाटबंधारे विभागाने तत्काळ शेवटच्या शेतापर्यंत सिंचनाची सुविधा करावी, अशी मागणी भाजपचे महामंत्री राजेश्वर चुधरी यांनी केली आहे.

Web Title: Thirsty farming was left without the water of Dina dam water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.