हजारो क्विंटल धान उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 01:25 AM2018-05-19T01:25:16+5:302018-05-19T01:25:16+5:30

येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतर्फे २०१७-१८ या वर्षात धानाची आधारभूत खरेदी करण्यात आली. येत्या काही दिवसातच पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. परंतु येथे खरेदी केलेला तब्बल १२०८०.६८ क्विंटल धान उघड्यावर असल्याने धानाची नासाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Thousands of quintals of rice open | हजारो क्विंटल धान उघड्यावर

हजारो क्विंटल धान उघड्यावर

googlenewsNext
ठळक मुद्देधानोरा तालुका : दहा केंद्रांवरून झाली होती आविकाची धान खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतर्फे २०१७-१८ या वर्षात धानाची आधारभूत खरेदी करण्यात आली. येत्या काही दिवसातच पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. परंतु येथे खरेदी केलेला तब्बल १२०८०.६८ क्विंटल धान उघड्यावर असल्याने धानाची नासाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत धानोरा तालुक्यात १० केंद्रांवरून धान खरेदी करण्यात आली. आठ ठिकाणी गोडावूनमध्ये धान साठविण्यात आला. परंतु तीन ठिकाणी गोडावूनची व्यवस्था नसल्याने ताडपत्री झाकून धानाचे पोते थप्पी मारून ठेवण्यात आले आहेत. काही दिवसांतच पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. अद्यापही धानाची उचल अथवा विल्हेवाट न लावल्याने धानातील तूट होऊन सोसायट्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे. मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
केवळ आठ गोडाऊन
धानोरा तालुक्यात आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतर्फे १० केंद्रावर २०१७-१८ या वर्षात एकूण ५७,३५८,८७ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. यामध्ये १४४६ आदिवासी शेतकऱ्यांकडून ३४,५७९.१२ क्विंटल, १०२७ गैरआदिवासी शेतकºयांकडून २२,७६९.७५ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. १० केंद्रांपैैकी ३ केंद्रावर गोडाऊन व्यवस्था नाही. तर ८ ठिकाणी गोडाऊन आहेत. या गोडाऊनमधील साठ्यापैकी तब्बल १२०८०.६८ क्विंटल धान गोडाऊन बाहेर उघड्यावर आहे.

Web Title: Thousands of quintals of rice open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.