देसाईगंजात दारूबंदीच्या तीन कारवाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 06:00 AM2019-10-16T06:00:00+5:302019-10-16T06:00:33+5:30

गोंदिया जिल्ह्यातून देसाईगंज शहरात दुचाकी वाहनाने दारू आणली जात असल्याची गोपनीय माहिती देसाईगंज पोलिसांना प्राप्त झाली. पोलीस हवालदार मोरेश्वर गौरकर, नाईक पोलीस शिपाई प्रेमकुमार भगत यांनी आमगाव ते सावंगी मार्गावरील नाल्याजवळ सापळा रचला. एमएच-४०-बी-६४०९ क्रमांकाची दुचाकी देसाईगंजकडे येताना दिसली. दुचाकीची तपासणी केली असता, दुचाकीवर देशी दारूचे पोते आढळून आले.

Three acts of drunkenness in Desaiganj | देसाईगंजात दारूबंदीच्या तीन कारवाया

देसाईगंजात दारूबंदीच्या तीन कारवाया

Next
ठळक मुद्दे४० हजारांची दारू जप्त : कप्पे असलेल्या बनियनचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज पोलिसांनी गेल्या दोन दिवसात तीन वेगवेगळ्या कारवाया करून ३८ हजार ८०० रुपये किमतीची देशी दारू जप्त केली आहे. त्यात एका दुचाकीस्वारासह दोन जणांना कपड्यांच्या आतमध्ये व बॅगमध्ये देशी दारूच्या ३०-३० बाटल्या लपवून विकताना पकडले.
१४ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजता रेल्वे स्टेशनवरून दारूची वाहतूक केली जात आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. सदर इसमाची बॅग तपासली असता, त्याच्या बॅगमध्ये आठ हजार रुपये किमतीची दारू आढळली. सुरज शंकर कांबळे (२१) रा.राजेंद्र वॉर्ड देसाईगंज यांना अटक केली.
गोंदिया जिल्ह्यातून देसाईगंज शहरात दुचाकी वाहनाने दारू आणली जात असल्याची गोपनीय माहिती देसाईगंज पोलिसांना प्राप्त झाली. पोलीस हवालदार मोरेश्वर गौरकर, नाईक पोलीस शिपाई प्रेमकुमार भगत यांनी आमगाव ते सावंगी मार्गावरील नाल्याजवळ सापळा रचला. एमएच-४०-बी-६४०९ क्रमांकाची दुचाकी देसाईगंजकडे येताना दिसली. दुचाकीची तपासणी केली असता, दुचाकीवर देशी दारूचे पोते आढळून आले. त्यामध्ये १०० बॉटल होत्या. त्याची किंमत आठ हजार रुपये आहे. दुचाकीची किंमत २० हजार रुपये, असा एकूण २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोनू रमेश दांडेकर (१९) रा.आंबेडकर वॉर्ड, देसाईगंज यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तिसरी कारवाई पोलीस स्टेशन परिसरातच करण्यात आली. तुकूम वॉर्डातील राहुल वानखेडे (३२) या युवकाची तपासणी केली असता, त्यांच्याकडे ३५ बॉटल आढळून आल्या. त्याची किंमत २ हजार ८०० रुपये होते. त्याने बॉटल ठेवण्यासाठी कप्पे असलेली बनियान शिवली होती. या कप्प्यांमध्ये त्याने बॉटल ठेवल्या होत्या. सदर कारवाई पोलीस शिपाई भावेश वरगंटीवार, श्रीकृष्ण जुआरे यांनी केली.
निवडणुकीनिमित्त देसाईगंज पोलिसांनी दारूतस्करांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे देसाईगंजातील दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

महिलांची दारू अड्ड्यावर धाड
मुरूमगाव : धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील दारू बंदी महिला समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धाड टाकून मोहफुलाची दारू जप्त केली आहे.पलटूराम भोयर यांच्या शेतात मोहफलांची दारू लपवून ठेवली असल्याची गोपनीय माहिती दारू बंदी पथकाला प्राप्त झाली. भोयर यांच्या शेतात तपासणी केली असता, त्याच्या शेतात पाच लिटर मोहफूलाची दारू आढळून आली. सदर दारू जप्त केली आहे. अजबसिंग विश्वकर्मा यांच्या शेतातूनही सात लिटर दारू जप्त केली आहे. मुरूमगावात दारू विक्रीवर बंदी आहे. दारूची विक्री करू नये याबाबत अनेकवेळा बजावूनही काही नागरिक दारू विक्री करतात. भोयर व विश्वकर्मा यांचे प्रकरण तंटामुक्त गाव समिती मुरूमगाव यांच्या कडे ठेवले जाणार आहे. तंटामुक्त समिती जो निर्णय घेईल तो निर्णय मानावा लागणार आहे. अशी माहिती दारू बंदी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. सदर कारवाई प्रतिभा उईके, बिंदिया मडकाम, आशोबाई पिट्टा, पुष्पा कोठवार, पार्वती तिरकी, संगिता पोया, पार्वती गवर्णा, देवंतीन भोयर, चैतीबाई देहारी, महानतीनबाई ओरमडीया, प्रेमिला कोटपरिया, अनारबाई पिद्दा, सायरा शेख यांनी केली.

Web Title: Three acts of drunkenness in Desaiganj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.