खवले मांजर जंगलात पकडून ठेवणाऱ्या तिघांना अटक

By गेापाल लाजुरकर | Published: July 17, 2023 10:01 PM2023-07-17T22:01:37+5:302023-07-17T22:02:43+5:30

दाेघांना न्यायालयीन काेठडी : एकाची झाली सुटका

three arrested for keeping a scaly cat | खवले मांजर जंगलात पकडून ठेवणाऱ्या तिघांना अटक

खवले मांजर जंगलात पकडून ठेवणाऱ्या तिघांना अटक

googlenewsNext

गाेपाल लाजूरकर, गडचिराेली: वन्यजीव अनुसूची १ मध्ये येत असलेले व अतिशय दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या खवले मांजराला पकडून अवैधरित्या जंगलात बांधून ठेवणाऱ्या तीन आराेपींना वन विभागाने १५ जुलै राेजी अटक केली. सदर आराेपींना न्यायालयात हजर केले असता दाेघांना न्यायालयीन काेठडी झाली तर एकाची सुटका करण्यात आली.

निताई दास, हृदय बाला रा. श्रीनिवासपूर (ता. चामाेर्शी) अशी आरोपींची नावे आहेत. श्रीनिवासपूर येथील निताई गौतम दास (२२) हृदय रेवती बाला (३८) व अन्य एका अल्पवयीन आराेपींने १४ जुलै रोजी वन्यप्राणी खवले मांजर अवैधरित्या पकडून त्याला दोराने बांधून दुचाकी वाहनाने नेत हाेते. परंतु आराेपींना वनाधिकाऱ्यांची कुणकुण लागताच खवले मांजराला वनातच बांधून ठेवले. तसेच खवले मांजर हे जंगलात पळून गेल्याचे वनाधिकाऱ्यांना सांगितले. परंतु वनाधिकाऱ्यांनी स्वस्त न बसता गोपनीय माहिती काढून चामोर्शी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. वाडीघरे, चामोर्शीचे क्षेत्रसहायक ए. व्ही. लिंगमवार, भाडभिडीचे क्षेत्रसहायक व्ही. एस. चांदेकर, जामगिरीचे सिद्धार्थ गोवर्धन, आल्लापल्लीचे बोधनवार आदींच्या पथकाने १५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता श्रीनिवासपूर येथून तिन्ही आरोपींना चौकशी करीता ताब्यात घेऊन खवले मांजर पळून गेले. त्या ठिकाणी शोधण्यासाठी नेले असता खवले मांजर घोट-चामोर्शी मार्गावरील श्रीनिवासपूर शिवारात आढळले.

आराेपींना १५ दिवसांची काेठडी

खवले मांजर प्रकरणी वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २ (१),(१६),(ए),(बी),९,३९,५०,५१, नुसार दोन आरोपींना १६ जुलै रोजी चामोर्शी न्यायालयात तर एक आरोपी अल्पवयीन असल्याने बाल न्यायालय गडचिरोली येथे हजर केले. पुढील चौकशीसाठी वन कोठडी मागण्यात आली होती; मात्र न्यायालयाने निताई दास व हृदय बाला यांना १५ दिवसाची न्यायालीन कोठडी सुनावली. तर अल्पवयीन आराेपीस जमातीवर सोडण्यात आले.

गुप्तधन शाेधणे व काळ्या जादूसाठी हाेताे वापर

खवले मांजर प्राणी हा वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील अनुसूची_१ मध्ये येताे. हा प्राणी दुर्मीळ प्रजातीचा असून ताे नामशेष होण्याचा मार्गावर असलेल्या प्रजातीमध्ये येताे. सदर वन्य प्राण्याच्या अवयवांची आंतरराष्ट्रीय स्तरावर तस्करी होत असून त्याची किंमत अंदाजे ३० ते ४० लाखांपर्यंत आहे. गुप्तधन शाेधणे तसेच अंधश्रद्धेपाेटी काळी जादू करण्यासाठी त्याचा वापर व व्यापार केला जाताे.

Web Title: three arrested for keeping a scaly cat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.