विद्युत प्रवाहाने चितळाची शिकार, तीन आरोपींना अटक; ९ किलो मांस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2022 04:32 PM2022-05-27T16:32:36+5:302022-05-27T16:45:29+5:30

आरोपीच्या घरी गेलेल्या वनविभागाच्या पथकाला त्या आरोपीच्या घरात कासवाचे मटन शिजत असल्याचे आढळून आले. आरोपीला ताब्यात घेऊन चितळाच्या कच्च्या मांसासह कासवाचे शिजवलेले मांस जप्त करण्यात आले.

three held for killing chital in gadchiroli, 9 kg meat seized | विद्युत प्रवाहाने चितळाची शिकार, तीन आरोपींना अटक; ९ किलो मांस जप्त

विद्युत प्रवाहाने चितळाची शिकार, तीन आरोपींना अटक; ९ किलो मांस जप्त

Next
ठळक मुद्देचितळाच्या कच्च्या मांसासह कासवाचे शिजवलेले मांस जप्त तिघांचा शोध सुरू

घोट (गडचिरोली) : घोट वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या व नियतक्षेत्र कक्ष क्रमांक १५३१ मधील ठाकूरनगर येथे विद्युत प्रवाहातून चितळाची शिकार केल्याची घटना २५ मे रोजी उघडकीस आली. विशेष म्हणजे कारवाई करण्यासाठी आरोपीच्या घरी गेलेल्या वनविभागाच्या पथकाला त्या आरोपीच्या घरात कासवाचे मटन शिजत असल्याचे आढळून आले. आरोपीला ताब्यात घेऊन चितळाच्या कच्च्या मांसासह कासवाचे शिजवलेले मांस जप्त करण्यात आले.

ठाकूरनगर येथे चितळाची शिकार झाल्याची गुप्त माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने आरोपी रतन सूर्यकांत माझी याच्या घरावर धाड टाकली. यावेळी घरातील फ्रीजमध्ये चितळाचे ९ किलो मांस आढळून आले. स्वयंपाकघरात चौकशी केली असता गॅसवर कासवाचे मांस शिजवलेले आढळले. वनाधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष ते जप्त करून वनपरिक्षेत्र कार्यालय घोट येथे आणले.

आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले तर तीन आरोपी हाती लागले नाहीत. पुढील तपास आलापल्ली येथील प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी बोधनवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी एम.टी. गोन्नाडे, क्षेत्रसहायक व्ही.पी. लटारे, वनरक्षक जे. डी. मानकर, डी.एन. सरपाने, सुप्रिया गरमडे आदी करीत आहेत.

वीजप्रवाह लावून केली शिकार

दुपारच्या सुमारास ठाकूरनगरजवळच्या जंगलात चौकशीकरिता वनाधिकारी गेले असता शेतातून गेलेल्या ११,००० केव्ही वाहिनीच्या खाली तपासणी केली असता खासगी बोडीजवळ चितळाचे चामडे, शिंगे असलेले चितळाचे डोके आणि चार पायांचे खूर आढळून आले. २६ मे रोजी गुप्त माहितीच्या आधारे ठाकूरनगर येथील गणेश खितीस दास व भूपेन निरोध मंडल यांना चौकशीकरिता ताब्यात घेतले असता त्यांनी आरोपी रतन सूर्यकांत माझी याच्यासोबत वीज प्रवाहाद्वारे चितळाची शिकार केल्याचे कबूल केले.

Web Title: three held for killing chital in gadchiroli, 9 kg meat seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.