दोन अपघातात तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 11:10 PM2019-05-25T23:10:12+5:302019-05-25T23:10:31+5:30

ट्रॅक्टर उलटून महिला शेतकरी ठार झाली तर तीचा मुलगा व पती गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी जोगीसाखरा येथे घडली. तसेच सिरोंचा तालुक्यातील निमलगुडम गावच्या फाट्याजवळ ट्रकची दुचाकीला धडक बसली. यामध्ये दोघे ठार झाले.

Three killed in two accidents | दोन अपघातात तीन ठार

दोन अपघातात तीन ठार

googlenewsNext
ठळक मुद्देजोगीसाखरा व निमलगुडम येथील घटना । शेतावर जाताना ट्रॅक्टर उलटला

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी/गुड्डीगुडम : ट्रॅक्टर उलटून महिला शेतकरी ठार झाली तर तीचा मुलगा व पती गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी जोगीसाखरा येथे घडली. तसेच सिरोंचा तालुक्यातील निमलगुडम गावच्या फाट्याजवळ ट्रकची दुचाकीला धडक बसली. यामध्ये दोघे ठार झाले.
पुष्पा बाजीराव उईके (३२) रा. जोगीसाखरा असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती बाजीराव उईके (३५), मुलगा प्रणय उईके(१७) व ट्रक्टरवर बसलेली शिल्पा धर्मा कुमरे (१७) हे तीघे जखमी झाले आहेत. जोगीसाखरा येथील बाजीराव उईके हे पत्नी, मुलगा व अन्य एका मुलीला घेऊन ट्रॅक्टरने शेतीची कामे करण्यासाठी शेतात पांदन रस्त्याने जात होते. दरम्यान अचानक गुरांचा कळप ट्रॅक्टरच्या समोर आला. या कळपाला वाचविण्यासाठी वाहन चालक बाजीराव उईके यांनी ट्रॅक्टर बाजुला घेतली. मात्र ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. यात पुष्पा उईके ही जागीच ठार झाली. जखमींना विलास पेंदाम यांनी स्वत:च्या वाहनाने आरमोरी रूग्णालयात दाखल केले. अपघातात एकाच कुटुंबावर संकट कोसळल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी भेट घेतली.
ट्रकची दुचाकीला धडक
सीजी ०८ एसी ९२९७ क्रमांकाचा ट्रक तेलंगणातून लोखंड भरून गोंदियाकडे जात होता. तर छत्तीसगड राज्यातील संड्रा येथील रहिवासी असलेले नागरिक अहेरीवरून छत्तीसगडकडे सिरोंचा मार्गे जात होते. दरम्यान निमलगुडम फाट्याजवळ ट्रक व दुचाकी यांची समोरासमोर धडक बसली. सदर अपघात शनिवारी रात्री ७.३० वाजता घडला. या धडकेत दुचाकीवरील दोघेही ठार झाले. हे दोघेही छत्तीसगड राज्यातील संड्रा गावातील रहिवासी असल्याची माहिती प्राप्त झाली. मात्र त्यांची नावे कळू शकली नाही. दोघांनाही पोलिसांनी रूग्णालयात भरती केले. मात्र रूग्णालयाने त्यांना मृत घोषित केले.

Web Title: Three killed in two accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात