जिल्ह्यातील आमदारांना स्थानिक विकासासाठी तीन काेटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:56 AM2021-01-08T05:56:17+5:302021-01-08T05:56:17+5:30
गडचिराेली : काेराेनाचे संकट कमी हाेताच राज्य शासनाने जिल्ह्यातील विधानसभा आमदारांना स्थानिक विकासासाठी प्रत्येकी एक काेटी रुपये याप्रमाणे तीन ...
गडचिराेली : काेराेनाचे संकट कमी हाेताच राज्य शासनाने जिल्ह्यातील विधानसभा आमदारांना स्थानिक विकासासाठी प्रत्येकी एक काेटी रुपये याप्रमाणे तीन काेटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
विधानसभा क्षेत्रात विकासकामे राबविण्यासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी दाेन काेटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. २०२० या वर्षात संपूर्ण जगाला काेराेनाने ग्रासले हाेते. काेराेनावर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागला. यासाठी इतर विभागांच्या निधीत कपात करण्यात आली हाेती.
मे महिन्यात एक काेटी रुपयांचा स्थानिक विकास निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर आता निधी मिळणार की नाही, अशी शंका व्यक्त केली जात हाेती. मात्र राज्य शासनाने पुन्हा १ काेटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यात तीन विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. त्यामुळे तीन काेटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीमुळे ग्रामीण भागातील कामांना गती मिळेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
बाॅक्स .....
पायाभूत सुविधांसाठी खर्च हाेतो निधी
रस्ते व पूल बांधणी
अनेक गावांमध्ये अजूनही पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात वाहतुकीची अडचण हाेत असल्याने रस्ता व पुलांचे बांधकाम करण्यासाठी सर्वाधिक निधी खर्च केला जातो. अनेक गावांमध्ये अजूनही पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात वाहतुकीची अडचण हाेत असल्याने रस्ता व पुलांचे बांधकाम करण्यासाठी सर्वाधिक निधी खर्च केला जाते.
बाॅक्स ...
ग्रामीण भागात हातपंपांचे खाेदकाम
बहुतांश गावांमध्ये पाणीपुरवठा याेजना नाहीत. त्यामुळे हातपंप व विहिरींवर तहान भागवावी लागते. परिणामी गावांमधून हातपंपासाठी निधीची मागणी हाेते.
बाॅक्स ...
विकासनिधीत वाढ करण्याची गरज
प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जवळपास ३ लाख लाेकसंख्या आहे. तर जवळपास ४०० गावे येतात. ही गावे व लाेकसंख्येचा विचार केल्यास दाेन काेटी रुपयांचा विकास निधी अपुरा पडते. या निधीतून गावात वीज, पाणी, रस्ता यासारख्या पायाभूत सुविधासुद्धा पुरविणे कठीण हाेते. अनेक गावांमध्ये स्थानिक विकास निधीतून एकही काम हाेत नसल्याने त्या गावांमधील नागरिकांमध्ये आमदाराविषयी नाराजी निर्माण हाेते.