शिवणी येथे सापळा रचून तीन लाखांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 10:14 PM2018-07-23T22:14:52+5:302018-07-23T22:15:13+5:30
वाहनातून अवैैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीवरून राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या पथकाने चामोर्शी मार्गावरील शिवणी येथे सापळा रचून ३ लाखाच्या दारूसह ८ लाख किमतीचे चारचाकी वाहन असा एकूण ११ लाखांचा मुद्देमाल रविवारी रात्री जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. तर अन्य एक आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वाहनातून अवैैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीवरून राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या पथकाने चामोर्शी मार्गावरील शिवणी येथे सापळा रचून ३ लाखाच्या दारूसह ८ लाख किमतीचे चारचाकी वाहन असा एकूण ११ लाखांचा मुद्देमाल रविवारी रात्री जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. तर अन्य एक आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला.
राज्य उत्पादन शुल्क विभाग गडचिरोलीचे प्रभारी अधीक्षक पी. व्ही. गोतमारे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाच्या पथकाने चामोर्शी मार्गावरील शिवणी येथे रविवारच्या रात्री सापळा रचला. याच सुमारास एमएच ३१ डीव्ही- २९३८ या क्रमांकाचे वाहन चामोर्शीकडून गडचिरोलीकडे रस्त्याने येताना दिसले. या वाहनाला पथकाने अडवून झडती घेतली असता, वाहनातून सुपर सॉनिक रॉकेट संत्रा ब्रँडच्या देशी दारूच्या ९० मिलीच्या एकूण ६० पेट्या (६ हजार बॉटल्या) अशी ३ लाख रूपयांची दारू आढळून आली. दारूसह आठ लाख रूपये किमतीचे टाटा कंपनीचे सुमो ग्रँड चारचाकी वाहन उत्पादन शुल्क विभागाने जप्त केले. या प्रकरणी वाहनचालक रोहित सुधाकर बाबर रा. चिंतामणीनगरी ३ प्लॉट क्रमांक २५ ओमकारनगर बेसा रोड नागपूर याला अटक करून त्याच्यावर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तर एक इसम पसार होण्यास यशस्वी झाला. फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.
सदर कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक एस. एल. बोडेवार, जी. पी. गजभिये, एस. एम. गव्हारे, व्ही. पी. शेंदरे, व्ही. पी. महाकुलकर, एम. एम. कुळमेथे यांनी केली.