वाहनासह तीन लाखांचा दारूसाठा जप्त

By admin | Published: May 25, 2017 12:37 AM2017-05-25T00:37:45+5:302017-05-25T00:37:45+5:30

चारचाकी वाहनाने आरमोरी-गडचिरोली-चंद्रपूर मार्गाने अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना गडचिरोली पोलिसांनी...

Three lakhs of liquor was seized with the vehicle | वाहनासह तीन लाखांचा दारूसाठा जप्त

वाहनासह तीन लाखांचा दारूसाठा जप्त

Next

दोघांना अटक : एसडीपीओ कार्यालयाच्या पथकाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चारचाकी वाहनाने आरमोरी-गडचिरोली-चंद्रपूर मार्गाने अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना गडचिरोली पोलिसांनी बुधवारी चारचाकी वाहनासह अटक करून ३ लाख १६ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयाला आरमोरी - गडचिरोली - चंद्रपूर या मार्गाने अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गडचिरोली-आरमोरी मार्गावर सापळा रचला. एक सफेद रंगाची कार संशयास्पद आढळून आल्याने तिचा पोलिसांनी पाठलाग केला. येथील कारगिल चौकात या कारला थांबविण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता, वाहनामध्ये ५९ हजार १०० रूपये किंमतीच्या मॅकडॉल नं. १ कंपनीच्या विदेशी दारूच्या १९७ निपा, ७ हजार २०० रूपये किंमतीच्या आॅफीस चाईस ब्ल्यू कंपनीच्या २४ निपा व एमएच-३१ डी.सी. १६१८२ क्रमांकाची ५० हजार रूपये किंमतीची सफेद रंगाची मारूती कंपनीची कार असा एकूण ३ लाख १६ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारमधील हरदितसिंग सुरेंद्रसिंग गिल (२५), अमित कुमार आनंद सिंग (१८) दोन्ही रा. जरीपठका नागपूर यांना दारूबंदी कायद्यान्वये अटक करण्यात आली. सदर कारवाई गडचिरोली येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सिरसाठ, पोलीस हवालदार विजय राऊत, नायक पोलीस शिपाई दीपक डोंगरे, दोनाडकर आदींनी केली.
सदर प्रकरणात गडचिरोली जिल्ह्याबाहेरून आरमोरी मार्गे गडचिरोली जिल्ह्यात दारूची आयात होत होती. सदर कारवाईमुळे अवैध दारूपुरवठादार व विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. आरमोरी व देसाईगंजच्या परिसरात अनेक छुपे मार्ग असल्याने रात्रीच्या सुमारास दारूची मोठ्या प्रमाणात आयात होते. पोलिसांचीही अडचण होते.

Web Title: Three lakhs of liquor was seized with the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.