तीन महिन्यांत पेट्राेल ५ तर सिलिंडर १०० रुपयांनी महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:37 AM2021-02-10T04:37:03+5:302021-02-10T04:37:03+5:30
उज्ज्वला याेजनेंतर्गत शासनाने हजारो कुटुंबाला गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही आता गॅस सिलिंडर पाेहाेचून गॅसवर ...
उज्ज्वला याेजनेंतर्गत शासनाने हजारो कुटुंबाला गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही आता गॅस सिलिंडर पाेहाेचून गॅसवर स्वयंपाक करण्याची सवय महिलांना झाली आहे; पण पेट्रोल व डिझेलप्रमाणेच गॅसचा हंडाही अवाक्याबाहेर गेल्याने अनेक घरांत पुन्हा चूल पेटायला लागली आहे.
पेट्राेल व डिझेलच्या किमतीमध्ये दरदिवशी काही पैशांची वाढ केली जाते. ही वाढ ग्राहकांच्या नजरेस पडत नाही. मात्र, महिनाभरात पेट्राेलच्या दरात २ ते ३ रुपयांची वाढ होते. पेट्राेलचे दर आता ९४ रुपयांच्या पुढे पाेहाेचले असून पुढील एक-दाेन महिन्यांत शंभरी पार करतील, असा अंदाज आहे. डिझेलच्या दरातही वाढ हाेत आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढून याचा थेट परिणाम इतर वस्तूंच्या किमतीवर हाेत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी पेट्राेल व डिझेलच्या किमतीत महिन्यानंतर दाेन ते तीन रुपये वाढ केली जात हाेती. त्यावेळी आंदाेलने हाेत हाेती. आता मात्र थाेडीथाेडी दरदिवशी वाढ हाेत असल्याने जनतेच्या नजरेस पडत नाही व आंदाेलनेही हाेत नाहीत.
बाॅक्स
गॅस सिलिंडरवरील सबसिडी बंद हाेणार काय?
सुरुवातीच्या कालावधीत ग्राहकांना सबसिडी वगळून पैसे भरावे लागत हाेते. आता मात्र पूर्ण पैसे भरावे लागतात. त्यानंतर सबसिडी जमा केली जाते. सुरुवातीच्या कालावधीत २०० ते ३०० रुपये सबसिडी जमा केली जात हाेती. आता मात्र केवळ ४० रुपये सबसिडी जमा केली जात आहे. मागील चार महिन्यांपासून एवढीच सबसिडी जमा हाेत आहे. दर महिन्यात सिलिंडरचे दर वाढविले जात आहेत. सबसिडी मात्र कमी केली जात आहे. काही दिवसांनंतर केंद्र शासन पूर्णच सबसिडी बंद करून पेट्राेल व डिझेलप्रमाणे आंतरराष्ट्रीय किमतीनुसार गॅस सिलिंडरच्या किमती ठरविण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या महिन्याला गॅसच्या दरात बदल हाेत आहे. पुढे पेट्राेल व डिझेलप्रमाणे दरदिवशी बदल हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काेट
पेट्राेल ही अत्यावश्यक गरज बनली आहे. त्यामुळे कितीही वाढ झाली तरी ते खरेदी करावे लागणार आहे. याचा गैरफायदा शासनाकडून घेतला जात आहे. पेट्राेल व डिझेलवर विविध प्रकारचे कर शासनाकडून लावले जात असल्याने या वस्तू महाग होत चालल्या आहेत. पेट्राेल व डिझेलचे महत्त्व लक्षात घेऊन त्यावरील कर कमी करण्याची गरज आहे.
- शिवराम चरडुके, नागरिक
डिझेलच्या किमतीत वाढ हाेत आहे. त्यामुळे वाहतुकीचे दर वाढविल्याशिवाय पर्याय राहत नाही. मात्र, ग्राहकाला वाढीव वाहतुकीच्या दराविषयी सांगितल्यास ते वाढलेला दर मान्य करीत नाही. त्यामुळे वाहन चालकांना काही प्रमाणात नफा कमी करून व्यवसाय करावा लागत आहे. दरदिवशी डिझेलमध्ये हाेणारी वाढ जनतेच्या लक्षात येत नाही. याचा फटका वाहनधारकांना बसत आहे.
- संदीप डाेईजड, वाहन मालक
शहरात सिलिंडरवरील स्वयंपाकाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे दर वाढत असले तरी ते खरेदी करावी लागत आहे. पूर्वीच्या तुलनेत शासनाने सबसिडी कमी केली आहे. ४०० ते ५०० रुपयांत उपलब्ध हाेणाऱ्या सिलिंडरसाठी आता ७५० रुपये माेजावे लागत आहेत. शासनाने सिलिंडरचे दर कमी करावेत.
- मनीषा सेलाेटे, गृहिणी
अशी आहे इंधन दरवाढ
पेट्राेल (प्रतिलीटर)
८८.४४
८९.६६
९०.९८
९३.५०
डिझेल
७६.४२
७८.४६
७९.९६
८२.७०
सिलिंडर
६५०.५०
७५०.५०
७५०.५०
७५०.५०
७५०.५०