परतवाड्यात भरदुपारी थरार; तिघांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 05:00 AM2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:00:01+5:30

शहरात सोमवारी दिवसाढवळ्या ३८ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. या खुनाच्या घटनेनंतर उसळलेल्या उद्रेकात तीन जण गंभीर जखमी झाले. यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, एकाला मरणासन्न अवस्थेत अमरावतीच्या सामान्य रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनाक्रमानंतर परतवाडा, अचलपूर व सरमसपुरा या तीनही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली.

The three murder in Paratwada | परतवाड्यात भरदुपारी थरार; तिघांची हत्या

परतवाड्यात भरदुपारी थरार; तिघांची हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देउद्रेकानंतरच्या मारहाणीत दुसऱ्याची हत्या : दोन गंभीर, संचारबंदी लागू

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : शहरात सोमवारी दिवसाढवळ्या ३८ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. या खुनाच्या घटनेनंतर उसळलेल्या उद्रेकात तीन जण गंभीर जखमी झाले. यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, एकाला मरणासन्न अवस्थेत अमरावतीच्या सामान्य रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनाक्रमानंतर परतवाडा, अचलपूर व सरमसपुरा या तीनही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली. शाळांना सुटी देण्यात आली. श्याम रघू खोलापुरे (३९, रा. शक्ती स्वीट मार्ट, महावीर चौक, परतवाडा), मो. अतिक मो. रफीक (५५, रा. गटरमलपुरा, परतवाडा) व सै. अली मो. कलिम (२१, रा. परतवाडा) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
परतवाडा शहरातील टिंबर डेपोत सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जुगाराचा वाद आणि जुन्या वैमनस्यातून चाकुहल्ल्यात श्याम रघू खोलापुरे (३९, रा. महावीर चौक, परतवाडा) हा घटनास्थळीच ठार झाला. त्याच्यावर विशिष्ट समुदायातील पाच ते सहा इसमांनी हल्ला चढविला. घटनास्थळावर जुगार चालू होता. जुगाराचे पत्ते घटनास्थळी तसेच पडून होते. घटनेची माहिती कळताच काहींनी शहरात उद्रेक केला. दगडफेकीसह मारहाण करण्यात आली. गुजरीबाजारातील फळविक्रेत्यांच्या गाड्या, फुलारी गल्लीतील फुलांच्या दुकानांची, दुचाकींची तोडफोड केली. शहरातील गुजरीबाजार, श्याम टॉकीज परिसर, मोची गल्ली-गटरमलपुºयातही हा उद्रेक बघायला मिळाला. शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, गटरमलपुरा येथील उपद्रवी युवकांच्या हल्ल्यात जखमींपैकी मो. अतिक मो. रफीक व सै. अली मो. कलीम (२४) यांचा मृत्यू झाला, तर मो. फैजान मो. अफसर (२१, सैलानी प्लॉट, परतवाडा) व मो. नईम मो. करीम (३८, रा. मुगलाईपुरा) हे गंभीर जखमी आहेत.
उद्रेकानंतर शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. परतवाडा शहरातील बाजारपेठाही कडकडीत बंद केल्या गेल्यात.

गुजरीबाजार, गटरमलपुºयात दहशत
परतवाडा शहरातील गुजरीबाजारातील फुलाडी गल्ली व गटरमलपुरा येथे असामाजिक तत्त्वांनी राडा घातला. या व्यावसायिक पेठेतील अनेक दुचाकींची तोडफोड करण्यात आली. चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. दुचाकी आडव्या टाकून काहींनी व्यापाऱ्यांना धमकावले. याच ठिकाणी काहींनी चौघांना बेदम मारहाण केली. त्यात चौघे गंभीर झाले.

संचारबंदी पुढील २४ तास
परतवाड्यात दोन समुदायांतील तीन जणांचा खून झाल्यानंतर सोमवारी दुपारी ३.३० वाजता लागू करण्यात आलेली संचारबंदी पुढील २४ तासांकरिता राहणार असल्याचे अचलपूरचे एसडीओ संदीपकुमार अपार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ चे आदेशाच्या अधिन राहून विधानसभा-२०१९ साठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी, भरण्यासाठी इच्छुक उमेदवार निर्धारित वेळेत व तारखेत निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे उपस्थित राहू शकतात, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अचलपूर एसडीओ संदीपकुमार अपार यांनी स्पष्ट केले. संचारबंदी दरम्यान पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमू नये. मिरवणूक काढू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही शहरांना पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले.

Web Title: The three murder in Paratwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.