गडचिरोलीत चकमकीत तीन नक्षलवादी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 01:23 PM2018-04-03T13:23:34+5:302018-04-03T13:24:00+5:30

सिरोंचा तालुक्यातील व्यंकटापूर (बामणी)नजीकच्या सिरकोंडा जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाले. ही चकमक मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उडाली.

Three Naxalites killed in encounter in Gadchiroli | गडचिरोलीत चकमकीत तीन नक्षलवादी ठार

गडचिरोलीत चकमकीत तीन नक्षलवादी ठार

Next
ठळक मुद्देमृतात विभागीय समिती सदस्यासह दोन महिलांचा समावेशनक्षल्यांचे साहित्य जप्त, शोधमोहीम सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील व्यंकटापूर (बामणी)नजीकच्या सिरकोंडा जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाले. ही चकमक मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उडाली. मृतांमध्ये नक्षल्यांच्या विभागीय समितीचा सदस्य सुनील कुळमेथे याचा समावेश आहे. त्याच्यावर ८ लाख रु पयांचे बक्षीस होते.
प्राप्त माहितीनुसार, सकाळी सी-६० पथकाचे जवान व्यंकटापूर परिसरातील सिरकोंडा जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. या धुमश्चक्र ीनंतर घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना ३ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी तिन्ही मृतदेह व बरेच नक्षल साहित्य ताब्यात घेतले आहे. मृतांमध्ये दोन महिला नक्षल्यांचाही समावेश असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यापैकी एक महिला मृत नक्षल नेता सुनील कुळमेथे याची पत्नी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करून शोधमोहिम राबविली जात आहे.

Web Title: Three Naxalites killed in encounter in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.